Wednesday, December 14, 2022

ग्रामपंचायत मतदारांना भरपगारी सुटी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

 

ग्रामपंचायत मतदारांना भरपगारी सुटी

 जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

 

अमरावती, दि. 14 : राज्य निवडणूक आयोगाकडून अमरावती जिल्ह्यातील एकूण 14 तालुक्यातील 257 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासाठी मतदान रविवार, दि. 18 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदानाच्या दिवशी मतदारांना भरपगारी सुटीची विशेष सवलत देण्याचे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत.

या ग्रामपंचायतींपैकी चांदूर रेल्वे तालुक्यातील ग्रामपंचायत सावंगी संगम, नांदगाव खेडेश्वर तालुक्यामधील ग्रामपंचायत चिखली वैद्य, वरुड तालुक्यातील ग्रामपंचायत डवरगाव, मोर्शी तालुक्यामधील ग्रामपंचायत बेलोणा तसेच दर्यापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सांगवा बु. या पाच तालुक्यातील पाच ग्रामपंचायती अविरोध झाल्याने त्या ग्रामपंचायती वगळून उर्वरित 252 ग्रामपंचायतींची प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे.

            मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी संबंधित ग्रामपंचायतींच्या निवडणूक क्षेत्रातील सर्व दुकाने, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, व्यापार, औद्यागिक उपक्रम तसेच इतर आस्थापना किंवा निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या लगतच्या क्षेत्रातील औद्योगिक वसाहतीत तसेच महानगरपालिकेसारख्या मोठ्या नागरी वसाहतीच्या ठिकाणी नोकरीनिमित्त कामास येणाऱ्या संबंधित ग्रामपंचायतीमध्ये कामगारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदानाच्या दिवशी मतदारांना भरपगारी सुटीची विशेष सवलत देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यासाठी शहरी भागात किंवा निवडणूक नसलेल्या भागातील दुकाने, कंपन्या, वाणिज्यिक आस्थापना बंद ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

*****

No comments:

Post a Comment

विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!

  विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!   माहितीच्या महासागरात ज्ञानाचा दीप आणि मतांच्या कोलाहलात विवेकाचा ...