Wednesday, December 27, 2023

जिल्हाधिकारी कार्यालयात 29 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक दिन

 

जिल्हाधिकारी कार्यालयात 29 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक दिन

अमरावती, दि. 27 : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त शुक्रवार, दि. 29 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्राहकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी केंद्र शासनामार्फत ‘कंन्झ्युमर प्रोटेक्शन ईन द इरा ऑफ ई-कॉमर्स डिजीटल ट्रेड’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त ग्राहकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!

  विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!   माहितीच्या महासागरात ज्ञानाचा दीप आणि मतांच्या कोलाहलात विवेकाचा ...