Friday, May 17, 2024

अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन



अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

 

              अमरावती, दि. 17 (जिमाका): पोलिस ठाणे सिटी कोतवाली अमरावती (शहर) अंतर्गत एका अनोळखी इसमाचा मृतदेह रेल्वे स्टेशन उड्डानपुलावरील फुटपाथ येथे सापडला. मृतकाचे अंदाजे वय 50 ते 55 वर्षे असून मृतकाचा बांधा मध्यम, रंग सावळा, उंची 5 फुट 4 इंच, डोक्याचे केस काळे पांढरे, दाढी मिशी बारिक, काळी पांढरी, चेहरा गोल, डाव्या हातावर नरेश माधुरी नाव गोंदलेले होते. अंगामध्ये लांब बाह्याचा पांढरा मळकट फुल बाहेचा शर्ट, निळ्या रंगाचा फुलपॅन्ट लोवर त्यावर घुटण्याजवळ जॉर्डन असे लिहीलेले असून फुलपॅन्ट घातलेला आहे.

 

          मृतकाच्या नातेवाईकाचा शोध लागावा व अनोळखी इसमाची ओळख पटविण्यासाठी पोलीस नियंत्रण कक्ष, अमरावती शहर दुरध्वनी क्रमांक - 0721-2672001 किंवा वपोनी मनोहर कोटनाके  यांचा भ्रमणध्वनी क्रं. 8390151921 किंवा राजू सायगन यांचा भ्रमणध्वनी क्रं. 9823372165, 9823727600  क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरिक्षक पोलीस स्टेशन सिटी कोतवाली, अमरावती यांनी केले आहे.

                                                       00000

No comments:

Post a Comment

विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!

  विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!   माहितीच्या महासागरात ज्ञानाचा दीप आणि मतांच्या कोलाहलात विवेकाचा ...