Friday, April 27, 2018

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील
मुंबई, दि. 26 :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘रस्ते विकासामुळे राज्याच्या विकासाला गती’ या विषयावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून उद्या शुक्रवार दि. 27 एप्रिल रोजी संध्याकाळी 7.30 ते 8 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे.
        खड्डेमुक्त रस्ते अभियान, दोन वर्षाचे AMC, हायब्रीड ॲन्युईटी संकल्पना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, गाव आणि शहरे जोडण्यासाठी शासनाने घेतलेले निर्णय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सक्षमीकरण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व नाबार्डमार्फत सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामानंतर राज्यातील रस्त्यांची स्थिती याबाबत सविस्तर माहिती श्री. पाटील यांनी  'जय महाराष्ट्र’कार्यक्रमातून दिली आहे.

No comments:

Post a Comment

विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!

  विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!   माहितीच्या महासागरात ज्ञानाचा दीप आणि मतांच्या कोलाहलात विवेकाचा ...