Posts

Showing posts from August, 2020

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे व्यक्तित्व व कार्य दीर्घकाळपर्यंत स्मरणात राहील पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून शोक व्यक्त

  माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे व्यक्तित्व व कार्य दीर्घकाळपर्यंत स्मरणात राहील पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून शोक व्यक्त   अमरावती, दि. 31 : माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी हे देशाचे अग्रणी नेते, संवेदनशील व्यक्ती होते. त्यांचे व्यक्तित्व व कार्य दिर्घकाळापर्यंत देशाच्या स्मरणात राहील, अशा शब्दांत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी माजी राष्ट्रपती दिवंगत मुखर्जी यांना आदरांजली वाहिली.     माजी राष्ट्रपती मुखर्जी यांच्या निधनाबद्दल पालकमंत्री श्रीमती यांनी शोक व्यक्त केला.   दिवंगत मुखर्जी हे संवेदनशील व्यक्ती होते. त्यांचे सर्वांशी स्नेहाचे संबंध होते. भारतीय राजकीय मूल्यांची जपणूक त्यांनी आयुष्यभर केली. वंचित घटकांबाबत त्यांना विशेष आस्था होती. ते एक कृतीशील नेता व कुशल मार्गदर्शक होते. त्यांच्या जाण्याने नैतिक राजकीय मूल्यांची पाठराखण करणारा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला आहे, अशा शब्दात पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.   00000  

विमानतळ विकासकामे सहा महिन्यात पूर्ण होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
  विमानतळ विकास आढावा बैठक विमानतळ विकासकामे सहा महिन्यात पूर्ण होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे -   पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर   अमरावती, दि. 31 : अमरावती विमानतळ विकासाच्या प्रलंबित कामांबाबत तत्काळ माहिती सादर करावी व ही कामे येत्या सहा महिन्यांत पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले. अमरावती येथील विमानतळ विकासाबाबत बैठक पालकमंत्री ॲड. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार सुलभाताई खोडके , माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता रजनी लोणारे आदी यावेळी उपस्थित होते. प्राधिकरणाने डिसेंबरपर्यंत धावपट्टीचे काम पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. तथापि, प्रशासकीय इमारत व इतर कामेही वेळेत पूर्ण होऊन विमानसेवेला प्रारंभ होणे आवश्यक आहे. त्यासाठी फेज-1 व 2 मधील कोणती कामे प्रलंबित राहिली, त्याची माहिती सादर करावी. कामांचे पुनर्नियोजन करून सहा महिन्

पर्यटन विकासाच्या दृष्टीने 'सिडको'ने चिखलदऱ्यातील कामे गतीने पूर्ण करावीत - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

Image
  चिखलदरा सिडको प्रकल्प आढावा बैठक पर्यटन विकासाच्या दृष्टीने 'सिडको'ने चिखलदऱ्यातील कामे गतीने पूर्ण करावीत - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर   अमरावती, दि. 31 : चिखलदरा येथे सिडकोकडून सुविधा व सौंदर्यीकरणाची विविध कामे राबविण्यात येत आहेत. पर्यटन विकासाच्या दृष्टीने ही कामे गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी दिले. चिखलदरा येथे सिडकोकडून राबविण्यात येणाऱ्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार सुलभाताई खोडके, आमदार   राजकुमार पटेल, माजी आमदार   वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी शैलेश नवाल आदी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, चिखलदरा व मेळघाट वनभूमी अमरावती जिल्ह्याची संपदा आहे. चिखलदरा पर्यटन विकासाच्या दृष्टीने सिडकोकडून अनेक सुविधा व सौंदर्य विकास कामे राबविण्यात येत आहेत. ही कामे गतीने पूर्ण करा. कामे पूर्णत्वास नेताना वनविभागाची परवानगी आदी अडथळे येत असतील तर वेळीच माहिती द्या

कष्टकरी महिलांसाठी आर्थिक साक्षरता कार्यक्रम राबविणार - महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर

Image
  कष्टकरी महिलांसाठी आर्थिक साक्षरता कार्यक्रम राबविणार - महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर   अमरावती, दि. 31 : हिशेब न आल्याने कष्टकरी भगिनीची कुणीही खिल्ली उडवू नये. त्यांच्या प्रामाणिक कष्टाची कदर व सन्मान केला पाहिजे.   कष्टकरी भगिनीना आर्थिक साक्षर करण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून प्रशिक्षण कार्यक्रम राबवू, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे सांगितले.   एका कष्टकरी महिलेला हिशेब येत नसल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रामाणिकपणे कष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्या माताभगिनींची थट्टा होता कामा नये. याकडे संवेदनशीलपणे पाहिले पाहिजे. त्यांना आर्थिक साक्षर करून सक्षम करणे ही जबाबदारी सर्वांचीच आहे. महिला व बालविकास विभागातर्फे महिलांमधील आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठी राज्यात सर्वदूर प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येईल, असे   श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.   महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी विभागाकडून विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्यालाच जोडून असंघटित क्षेत्रातील महिलांमध्ये आर्थि

पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

Image
  सार्वजनिक इमारती विकास आढावा बैठक पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर   अमरावती, दि. 31 : जिल्ह्यात सार्वजनिक इमारतीची प्रस्तावित कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावीत. विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.   जिल्हा परिषद व इतर महत्वाच्या कार्यालयाच्या नियोजित प्रशासकीय इमारतींचा आराखडा,     नियोजन व अपेक्षित कामे आदींचा आढावा घेण्यासाठी   पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार सुलभाताई खोडके, आमदार राजकुमार पटेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे आदी यावेळी उपस्थित होते.   पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, इमारतीचे आराखडे परिपूर्ण असावेत. त्यांची रचना चांगली व नाविन्यपूर्ण व्हावी. दीर्घकालीन दृष्टीने नियोजन व्हावे. इमारतींचे स्वरूप चांगले, कल्पक, सौंदर्यपूर्ण अ
Image
  ‘मनरेगा’तील सिंचन विहीरींची मर्यादा २० पर्यंत वाढवली कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी होणार लाभ -           पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर   अमरावती, दि. ३० : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या सिंचन विहिरींची मर्यादा गावाची लोकसंख्या लक्षात घेऊन पाचवरून २० पर्यंत वाढविण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे, त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांना त्याचा लाभ मिळेल व सिंचनाची सोय होऊन कृषी उत्पादकता वाढण्यासही मदत होणार आहे, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (म.ग्रा.रो.ह.यो.) एका ग्रामपंचायतीमध्ये एका वेळी ५ सिंचन विहीरी मंजूर करता येतील अशी मर्यादा यापूर्वी घालून देण्यात आलेली होती. सिंचन विहिरींच्या कामांची शेतकरी बांधवांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे ही मर्यादा वाढवून मिळावी अशी मागणी होत होती. या मागणीचा विचार करून शासनाने गावाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ही मर्यादा वीसपर्यंत वाढविता येईल, असा निर्णय घेतला आ

खरीप पीक परिस्थिती व योजनांचा कृषीमंत्र्यांकडून आढावा

Image
  खरीप पीक परिस्थिती व योजनांचा कृषीमंत्र्यांकडून आढावा 'पोकरा'तील प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढा ‘पोकरा’ची परिणामकारक अंमलबजावणी व्हावी - कृषीमंत्री दादाजी भुसे   अमरावती, दि.२९ :हवामान बदलांना अनुकूल असा कृषीविकास करून शेतकरी व संपूर्ण कृषीक्षेत्राला सक्षम करण्याचा पोकरा योजनेचा हेतू आहे. तथापि,योजनेत सद्य:स्थितीत अमरावती जिल्ह्यात कृषी कार्यालयांकडून अनेक अर्ज प्रलंबित असल्याचे दिसते. त्यामुळे कृषी विभागाने मिशन मोडवर कामे करून महिनाभराच्या आत प्रलंबित कामांचा निपटारा करावा, असे निर्देश राज्याचे कृषी   मंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिले. जिल्ह्यातील खरीप परिस्थिती व विविध योजनांचा आढावा कृषी मंत्री श्री.भुसे यांनी आज नियोजन भवनात घेतला, त्यावेळी ते बोलत होते. महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, आमदार बळवंतराव वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, कृषी संचालक नारायण शिसोदे, सह संचालक सुभाष नागरे, जिल्हा कृषी अधीक्षकअधिकारी विजय च

पालकमंत्र्यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा

Image
  पालकमंत्र्यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा ऑक्सिजन सिलेंडर उपलब्धतेसाठी सर्वंकष प्रयत्न व्हावेत -           पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर अमरावती, दि. 28 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यसेवेच्या अन्य सुविधांप्रमाणेच पुढील काळासाठी ऑक्सिजन सिलेंडरची पुरेशी उपलब्धता असण्यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हावेत, असे   निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या उपस्थितीत पुनर्वसन उपाययोजनांबाबत बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार सुलभाताई खोडके, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, सचिव रवींद्र खांडेकर, संजय तीरथकर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना नियंत्रणासाठी सर्वंकष व एकसंध प्रयत्नांची गरज आहे. सद्य:स्थितीत ऑक्सिजनची पुरेशी उपलब्धता असली तरीही रूग्णांची वाढती संख्या पाहता यापुढेही ऑक्सिजनच्या पुर

प्रकल्प पुनर्वसनाच्या कामांच्या सद्य:स्थितीचा अहवाल द्यावा

Image
  प्रकल्प पुनर्वसनाच्या कामांच्या सद्य: स्थितीचा अहवाल द्यावा -           पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश अमरावती, दि. 28 : जिल्ह्यातील   निम्न वर्धा, बेंबळा आदी प्रकल्पांच्या पुनर्वसनाच्या कामांची सद्य:स्थिती   व आवश्यक कार्यवाहीबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले. प्रकल्प पुनर्वसन उपाययोजनांबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज झाली, आमदार प्रताप अडसड, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, निम्न वर्धा प्रकल्प, बेंबळा प्रकल्प, जीवन प्राधिकरण आदींचे अधिकारी- कर्मचारी यावेळी   उपस्थित होते. प्रकल्प पुनर्वसितांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रलंबित कामे, भूसंपादन, प्रलंबित निधी आदींचा सविस्तर अहवाल सादर करावा. आवश्यक तिथे शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. मात्र, ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावीत. पुनर्वसित बांधवांच्या अडचणी जाणून घेऊन त्याचे वेळीच निराकरण करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी याव