Wednesday, September 21, 2016

महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची
सह व्यवस्थापकीय संचालक यांची पहाणी
* शेतकऱ्यांना व्यावहारिक फायदे लक्षात आणून द्या

            अमरावती, दि.21 (जिमाका): विदर्भातील शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे, शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला अधिक शिघ्र गतीने मोठ्या बाजारपेठेमध्ये पोहचविण्यासाठी व्यवस्था निर्माण असावी, शेतकऱ्यांना आपल्या शेतमालावर प्रक्रिया करुन त्यांचा अधिक लाभ घेता यावा या करीता महाराष्ट्र कृषि समृद्धी विकसित करणे आणि त्या कृषि समृद्ध केंद्राला नागपूर व मुंबईला जोडण्यासाठी महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असुन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर यांनी नांदगाव खंडेश्वर येथील शासकीय ई-क्लास, एमआयडीसी, धामणगाव रेल्वे येथील जागेची पहाणी केली.

          या उच्चस्तरीय पहाणी पथकात सह व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर यांच्यासह जिल्हाधिकारी किरण गित्ते, एमएसआरडीसी चे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अधिक्षक अभियंता सुनिल देशमुख, इंडिया मॅजिक आयचे राजेश देशमुख, कार्यकारी अभियंता घोडके, कार्यकारी अभियंता हेमंत दवे, अन्य वरिष्ठ अधिकारी, उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, तहसिलदार वाहुरवाघ, राजगडकर आदी उपस्थित होते.

          नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी, रसुलापूर, चिखली वैद्य येथील शेतकऱ्यांचा महामार्गाला जमीन देण्याबाबतचा विरोध लक्षात घेवून या गावांना वगळून पर्यायी मार्गाची पडताळणी देखील पहाणी दरम्यान उच्चस्तरीय पथकाने केली.

          त्यांनतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवनमध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील महामार्गाशी संबंधित तलाठी व संवादक यांची बैठक घेवून या तालुक्यातील महामार्गाशी संबंधित सर्व शेतकऱ्यांचे काय म्हणणे आहे हे ऐकूण घेतले. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग व कृषि समृद्धी केंद्र या प्रकल्पात जास्तीत जास्त शेतकरी भागीदार होतील या दृष्टीने प्रयत्न करावेत कारण हा प्रकल्प शेतकऱ्यांचा आहे. शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा प्रत्यक्ष फायदा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. केवळ अपवाद म्हणून भुसंपादन कायद्याचा वापर करण्यात येईल असे सांगून कुरुंदकर म्हणाले, आपण शेतकऱ्यांशीही संवाद साधला आहे. या प्रकल्पा संदर्भात शेतकऱ्यांचे रास्त म्हणणे ऐकूण त्यानुसार धोरनात्मक बदल करण्यात येईल. वर्धा, नाशिक या जिल्ह्यात शेतकऱ्यांचा या प्रकल्पासाठी वाढता पाठिंबा आहे. शेतकरी स्वयंस्फुर्तीने पुढे येवून संमतीपत्र देत आहेत. तलाठी व संवादकांनी प्रकल्पाशी संबंधित प्रत्येक शेतकऱ्यांशी संवाद साधुन रेडीरेकनर नुसार व भागीदारी पद्धतीने काय फायदे होतात याचा प्रत्यक्ष कागदपत्र माहिती दाखवावी. शेतकऱ्यांचे पुर्ण समाधान होईपर्यंत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. काही लोक हेतु

पुरस्सर जाणिव पुर्वक सकारात्मक विचार करु देत नाहित. कृषि समृद्धी प्रकल्पाच्या ठिकाणी शाळा, कॉलेज, प्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोरेज, वीज, पाणी आदी सर्वच सोयी उपलब्ध होणार आहे. एक प्रकारचे नवीन शहरच वसणार आहे. विससित लेआऊटमध्ये हा भुखंड असणार आहे. प्रत्येक गावाचा नकाशा तयार करुन महामार्गाची आरआर व्हॅल्यु दाखवावी. शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधावा, गटागटात चर्चा करावी, शंका असल्यास वरिष्ठांशी चर्चा करावी. वरिष्ठ प्रत्यक्ष संबंधित शेतकऱ्यांपर्यंत जावून खुलासा करतील.

          राज्याचे मा.मुख्यमंत्री यांनी विदर्भ, मराठवाड्यातील संपादकांशी प्रत्यक्ष चर्चा या प्रकल्पाबाबत केली. बहुतांश शेतकऱ्यांची या प्रकल्पासाठी संमती दर्शविली आहे. ज्यांनी ज्यांनी संमती दर्शविली आहे त्यांच्याकडून या महिन्याअखेर संमतीपत्र घ्यावे. या प्रकल्पासाठी ज्यांच्या ज्यांच्या जमीनी लागणार आहे तो शेतकरी, जिल्हाधिकारी, शासन यांच्यामध्ये करार होणार असुन तलाठ्यांनी कृषि समृद्धी प्रकल्पातील भागीदारीच्या अगोदरची स्थिती व नंतरची स्थिती याची तुलना करुन दाखवावी. या प्रकल्पातील योजनेचे वैयक्तिक व सामुहिक फायदे समजावुन सांगावे. ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून विरोध होईल त्या ठिकाणी पर्यायी मार्ग काढण्यात येईल. शेतकऱ्यांचे नुसकान होवू नये म्हणून महसुल यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी आराखडे तयार करुन शेतकऱ्यांना दाखवावेत. हे करत असतांना सर्व्हे नंबर निहाय आराखडे करावे.

          महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि.7 सप्टेंबर, 16 रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसुचनेनुसार असलेल्या शेतकऱ्यांना प्रकल्पात भागीदार करुन घेतले जाणार आहे. या भागीदारीमध्ये शेतकऱ्यांना भुसंचयन योजनेनुसार मोबदला दिला जाईल. सोबतच भुसंपादनाचाही पर्याय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध राहणार आहे.

          भुसंचयन मध्ये शेतकरी भागीदार झाले तर त्यांना जिरायत जमीनीकरीता 25 टक्के बिनशेती विकसित भुखंड तसेच बागायती जमीनीकरीता 30 टक्के बिनशेती विकसित भुखंड कृषि समृद्धी केंद्र येथे मिळणार आहे अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली.

          यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांनीही बैठकित उपयुक्त मार्गदर्शन केले.  
00000

काचावार/गावंडे/सागर/दि.20-09-2016/17-45 वाजता







भातकुली तालुक्यातील 21 गावांमध्ये
रास्तभाव दुकान मंजुरीसाठी स्वयंम सहाय्यता बचत गटांकडून अर्ज आमंत्रित *जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
            अमरावती दि.21 (जिमाका): शासन आदेशानुसार रास्तभाव दुकाने स्वयं सहाय्यता महिला बचत गटांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के वानखडे यांनी भातकुली तालुका क्षेत्रातील 21 गावांकरीता दि. 20 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर 16 दरम्यान संबंधितांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे.   
          दि. 20 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर 16 दरम्यान भातकुली तालुक्यातील परलाम, नवथाळ बु., चेचरवाडी, उमरापुर, ततारपुर, इब्राहिमपुर, उदापुर, मक्रमपुर, नारायणपुर, वंडली, बोकुरखेडा, मलकापुर, कृष्णापुर, कोलटेक, निंदोळी, बैलमारखेडा, सरमसपुर, अडवी, डेंगुरखेडा, काकरखेडा, मक्रंदाबाद या गावात रास्तभाव दुकानांसाठी स्वयं सहायता महिला बचत गटांना अर्ज सादर करण्याचे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संबंधीत महिला बचतगटांना अर्ज कार्यालयीन वेळेत भातकुली तहसील कार्यालयामध्ये विक्री व स्वीकृत केल्या जातील.   
          जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या दिशानिर्देशानुसार ज्या गावासाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याच गावातील स्वयं सहाय्यता महिला बचत गटांना अर्ज करता येणार आहे. स्वयं सहाय्यता बचत गटाची निवड करतांना महिला स्वयं सहायता गटांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. महिला बचत गट उपलब्ध न झाल्यास पुरुष बचत गटांना प्राधान्य देण्यात येईल. जेष्ठ, वर्धनक्षम व नियमित गटांचा निवडीदरम्यान विचार करण्यात येणार आहे. रास्त भाव दुकान परवाना मंजुर करण्याची कार्यवाही जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती द्वारे करण्यात येईल. समिती समक्ष परवाना मंजुरीसाठी येणारे प्रस्ताव महिला ग्रामसभेसमोर विचारार्थ व शिफारशीसाठी ठेवील. महिला ग्रामसभेच्या शिफारशीनुसार प्रस्तावाला अंतिम मंजुरी देण्यात येईल.
          संबंधीत स्वयं सहाय्यता महिला बचत गटांनी विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रासह रास्तभाव दुकानांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखडे यांनी केले आहे.
00000

काचावार/कोल्हे/दि.21-09-2016/15-59 वाजता
22 सप्टेंबरच्या सकाळी 8 वाजता पासुन ते मराठा मुक मोर्चा संपेपर्यत
शहरात कलम 33 (1) (ब) लागू

            अमरावती, दि.20 (जिमाका): मराठा समाजाला आरक्षण मिळावे व इतर मागण्याकरीता सकल मराठा समाज बांधव अमरावती जिल्हा तर्फे दि.22 सप्टेंबर, 16 रोजी मराठा क्रांती मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्च्यासाठी अमरावती जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वाहनासह नागरिक नेहरु मैदान येथे एकत्रित होवून नेहरु मैदान येथून मुक मोर्चाची सुरुवात करणार आहे. मोर्चा हा नेहरु मैदान-राजकमल चौक-शाम चौक-जयस्तंभ चौक-मालविय चौक-मर्च्युरी टी पॉईंट-इर्विन चौक-गर्ल्स हायस्कुल चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे.
          मोर्चाच्या या मार्गामध्ये वाहतुकीची कोंडी निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्या दृष्टीने मुंबई पोलिस कायदा कलम 33 (1) (ब) अन्वये तसेच मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 अन्वये पोलिस उपायुक्त (मुख्यालय) अमरावती शहर शशीकुमार मीणा यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार अमरावती शहरात दि.22 सप्टेंबर, 16 चे सकाळी 8 ते मोर्चा संपेपर्यंत खालीलप्रमाणे मार्गावरील वाहतुक बंद करुन इतर मार्गाने वळविण्याबाबत आदेश पारित केले आहे.
          जुनी वस्ती बडनेरा येथून गोपाल नगर कडुन, टी पॉईटकडून शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड व हलके चारचाकी मालवाहू वाहनांना व सिटी बसेस, एस.टी.बसेस यांना शहरामध्ये वाहतुक करण्यास प्रतिबंध राहील. त्यांनी जुनी वस्ती बडनेरा, जुना बायपास मार्गे बियाणी चौक, वेलकम टी पॉईट, रहाटगाव रिंगरोड, कठोरा जकात नाका, राजपुत धाबा या मार्गाचा शहरामध्ये येण्यासाठी अवलंब करावा. एस.टी.बस व सिटी बस यांना चपराशी चौक येथून डावे वळण घेवून फक्त बसस्थानक पर्यंतच येता येईल. या मार्गाने वाहतुन करणाऱ्या मोटार सायकल स्वारांना बियाणी चौक, आरटीओ मार्गे पंचवटी चौक, शेगाव नाका या मार्गाचा वापर करता येईल.
          वलगावकडुन कठोरा नाका मार्गे शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड व हलके चारचाकी मालवाहु वाहनांना शहरामध्ये वाहतुक करण्यास प्रतिबंध राहिल. त्यांना राजपुत धाबा, रहाटगाव रिंगरोडचा वापर करुन बडनेराकडे जाता येईल किंवा नवसारी रिंगरोडचा वापर करुन ट्रान्सपोर्ट नगरपर्यंत जाता येईल. या मार्गाने वाहतुक करणाऱ्या एस.टी.बसेसला राजपुत धाबा, रहाटगाव रिंगरोड, वेलकम टि पॉईट, बियाणी चौक, चपराशी पुरा चौक मार्गे एस.टी.स्टॅन्ड पर्यंत येता येईल. नागपूरकडुन येणाऱ्या एस.टी.बसेसला वेलकम टि पॉईट बिायाणी चौक, चपराशी पुरा चौक मार्गे एस.टी.स्टॅन्ड पर्यत येता येईल. इतर हलके व जड मालवाहु वाहनांना रहाटगाव रिंगरोड, नवसारी मार्गे ट्रान्सपोर्ट नगर पर्यत जाता येईल.
          भातकुली व लालखडी कडुन येणाऱ्या एस.टी.बसेस यांना नागपूरी गेट चौक येथून डावे वळण घेवून नवारी रिंगरोड, कठोरा जकात नाका, रहाटगाव रिंगरोड, वेलकम टि पॉईट, टि पॉईट बियाणी चौक, चपराशी पुरा चौक मार्गे एस.टी.स्टॅन्ड पर्यंत येता येईल. इतर हलके व जड मालवाहू वाहनांना नागपूरी गेट पासुन शहरात जाता येणार नाही.
          एस.टी. स्टॅन्ड व हमालपुराकडून रेल्वे स्टेशन, उड्डाणपुल मार्गे जयस्तंभ चौक व राजकमल चौकाकडे जाणारा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांना बंद राहिल. त्यांनी एस.टी. स्टॅन्डपासुन मालटेकडी चौक, श्यामनगर चौक, प्रशांतनगर चौक मार्गे कल्याण नगर व हमालपुराकडुन शहरात जाणाऱ्या वाहनांनी बँक ऑफ महाराष्ट्र व रुख्मीणी नगरकडुन आत जाणाऱ्या इतर मार्गाचा अवलंब करुन कल्याण नगर ते राजापेठ या मार्गाचा अवलंब करावा.
          रेल्वे स्टेशन चौकाकडून मर्च्युरी टि पॉईटकडे सर्व प्रकारचे वाहनांना वाहतुकीस प्रतिबंध राहिल त्यांनी वरीलप्रमाणे मार्गाचा अवलंब करावा.
          बियाणी चौकाकडुन कोर्ट चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रतिबंध राहिल. त्यांनी वेलकम टि पॉईंट रहाटगाव रिंगरोड मार्गाचा अवलंब करावा.
          बसब स्टॅन्डकडुन गर्ल्य हायस्कुल चौकाकडे येता येणार नाही. त्यांनी विलासनगर चौक, चौधरी चौक मार्गाचा किंवा पंचवटी चौक, वेलकम टि पॉईट, बियाणी चौक, चपराशीपुरा चौक या मार्गाचा अवलंब करावा.
          पोलिस पेट्रोलपंपाकडून गर्ल्स चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहिल. त्यांनी चपराशी पुरा चौक जुना बायपास मार्गाचा अवलंब करावा.
          राजापेठ ते राजकमल चौक ते मालविय चौक ते कोर्ट चौक, चित्रा चौक ते मालविय चौक ते कोर्ट चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनाच्या आवागमनास बंद राहिल. या मार्गाने वाहतुक करणाऱ्या वाहनांनी गांधी चौक, टांगापाडाव चौक, चित्रा चौक, दिपक चौक, चौधरी चौक, विलास नगर चौक ते बाबा कॉर्नर या मार्गाचा अवलंब करावा तसेच या मार्गावर राहणाऱ्या नागरिकांनी इतर अंतर्गत मार्गाचा अवलंब करावा.
          रेल्वे स्टेशन चौक ते राजकमल चौक, जयस्तंभ चौक, राजापेठे ते राजकमल चौक मार्गे मालविय चौक, चित्रा चौक ते कोर्ट चौक तसेच उडाणपुला खालीली या मार्गावर असलेल्या सर्व दुकानांचे समोर व इतर अंतर्गत मार्गावर कोणतेही वाहन उभे राहणार नाही.
          त्याच प्रमाणे सहा. पोलिस आयुक्त (वाहतुक), अमरावती शहर यांना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोणातुन नियोजित अधिसुचनेमध्ये मराठा क्रांती मुक मोर्चा बंदोबस्त कालावधी दरम्यान वाहतुकीच्या नियमाबाबत अंशत: बदल करण्याचे अधिकार प्रदान करण्यात येत आहे.
          ही अधिसुचना दि.22 सप्टेंबर, 16 चे सकाळी 8 वाजता ते मराठी क्रांती मुक मोर्चा कालावधी पुरताचा अंमलात राहिल. जो कोणी वाहनधारक सदर अधिसुचनेचे उल्लघन करेल त्यांच्या विरुद्ध मोटार वाहन कायदा 1988 व महाराष्ट्र पोलिस कायदा 1951 अन्वये कार्यवाही करण्यात येईल असे पोलिस उपायुक्त (मुख्यालय) अमराती शहर यांनी कळविले आहे.
00000

काचावार/गावंडे/20-09-2016/19-05 वाजता
शहिद जवान पंजाब उर्फ विकास जानराव उईके
यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
* पालकमंत्री प्रविण पोटे यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली
* बंदुकीच्या फैरी झाडुन पोलिसांनी दिली मानवंदना

            अमरावती, दि.20 (जिमाका): जम्मु कश्मीर मधील उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर रविवारी पहाटे दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला त्यात अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील जवान पंजाब उर्फ विकास जानराव उईके हे शहिद झाले. नांदगाव खंडेश्वर येथील लाखानी मैदानावर शहिद जवान पंजाब उईके यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

          महाराष्ट्र शासनाच्या वतीने पालकमंत्री प्रविण पोटे यांनी शहिद पंजाब उईके यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. सैन्यदलाच्या वतीने कॅप्टन आशिष चंदेल, नायक सुभेदार एल.जी.ढोले, नायक सुभेदार एन.पी.जिवन तसेच प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी किरण गित्ते, पंजाब उईके यांचे वडील व आर्मीमध्ये सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक जानराव उईके यांनीही पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. यावेळी पोलिसांच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी झाडुन शहिद पंजाब उईके यांना मानवंदना देण्यात आली. शहिद पंजाब उईके यांच्या पार्थिवास त्यांचे छोटे बंधु विकास उईके यांनी अग्नी दिला. त्यानंतर उपस्थित हजारोंच्या जनसमुदायांनी दोन मिनिटे स्तब्ध राहुन श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर शेवटी सामुहिक राष्ट्रगीत झाले.   

          यावेळी शहिद पंजाब यांची आई सौ.बेबीताई उईके, बहिण सौ.प्रिती, लहान भाऊ विकास, जावाई गजानन इरपाते, खा.रामदास तडस, आ.डॉ.अनिल बोंडे, आ.बच्चु कडु, आ.विरेंद्र जगताप, आ.आशिष देशमुख, भाजप शहराध्यक्ष दिनेश सुर्यवंशी, पोलिस अधिक्षक लखमी गौतम, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी फ्ला.ले. रत्नाकर चरडे, उप विभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, तहसिलदार वाहुरवाघ, चांदूर रेल्वेचे तहसिलदार राजगडकर, यांच्यासह नांदगाव खंडेश्वर व पंचक्रोशितील सुमारे दहा हजारच्या वर जनसमुदाय उपस्थित होता.
शहिद पंजाब च्या कुटुंबियांनी घेतले अखेरचे दर्शन

       बेलोरा विमानतळावरुन साधारण दुपारी 12 वाजता नांदगाव खंडेश्वरचे सुपुत्र व देशाचा जवान शहिद पंजाब उईके यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी सैन्य दलाच्या खास वाहनाने आणण्यात आले. तेथे शहिद पंजाब यांची आई सौ.बेबीताई, वडील जानराव, बहिण प्रितीताई, भाऊ विकास यांच्यासह उपस्थित सर्व आप्त, स्वकीयांनी दर्शन घेतले. शहिद पंजाब यांचे पार्थिव दर्शनासाठी काही काळ घरी ठेवण्यात आला होता. तेथेही पालकमंत्री प्रविण पोटे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, आ.डॉ.अनिल बोंडे, आ.विरेंद्र जगताप, आ.आशिष देशमुख आदिंनी पुष्प वाहुन श्रद्धांजली वाहिली व कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी कुटुंबियांनी धार्मिक विधी केला. यावेळीही हजारोंच्या संख्येने महिला, शालेय विद्यार्थी-विद्यार्थींनी उपस्थित होते.

          सकाळी 11-15 वाजता सैन्यदलाच्या हेलिकॉप्टरने बेलोरा विमानतळावर शहिद पंजाब उईके यांचे पार्थिव नागपूरहुन आणण्यात आले. पार्थिव आणल्यानंतर बेलोरा विमानतळावर पालकमंत्री प्रविण पोटे यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी आ.डॉ.अनिल बोंडे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलिस अधिक्षक लखमी गौतम, कॅप्टन आशिष चंदेल, राष्ट्रसेविका समितीच्या मधुरा पांडे, जिल्हा संघ चालक चंद्रशेखर भोंदु, निवेदिता दिघडे-चौधरी यांनी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.

          सैन्यदलाच्या विशेष वाहनाने शहिद पंजाब उईके यांचे पार्थिव बेलोरा विमानतळावरुन नांदगाव खंडेश्वर येथे नेण्यात आले. नांदगाव खंडेश्वर येथे जात असतांना रस्त्यात धानोरा (गुरव), चोर माहुली तसेच अन्य गावात अबाल वृद्धांसह हजारोच्या संख्येनी पुष्पवृष्टी करुन अभिवादन केले. आपल्या देशासाठी शहिद झालेल्या लाडक्या जवानाला साश्रूनयनांनी निरोप दिला. अमरावती शहरापासुन नांदगाव खंडेश्वर पर्यंत विविध ठिकाणी फलक लावुन शहिद पंजाब उईके यांना आदरांजली वाहिली.
00000
काचावार/गावंडे/सागर/झिमटे/खंडारकर/हरदुले/20-09-2016/17-25 वाजता






















पालकमंत्री प्रविण पोटे यांचा दि.20 ते 23 सप्टेंबर पर्यतचा
सुधारित अमरावती जिल्हा दौरा
            अमरावती, दि.19 (जिमाका): अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग, खनिकर्म, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळुन) राज्यमंत्री प्रविण पोटे हे दि.20 ते 23 सप्टेंबर, 16 पर्यंत अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा तपशिल दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
            दि.20 सप्टेंबर, 16 रोजी सकाळी 5.50 वाजता मुंबईवरुन बडनेरा, अमरावती येथे आगमन व शासकीय मोटारीने राठीनगर, निवासस्थानाकडे प्रयाण. सकाळी 6.30 वा. राठीनगर निवासस्थानी आगमन व राखीव. सकाळी 10 वा. राठीनगर येथून शासकीय वाहनाने नांदगांव खंडेश्वर, जि.अमरावती कडे प्रयाण. सकाळी 10.45वा. नांदगांव खंडेश्वर येथे शहीद विकास जानराव उईके या जवानास श्रद्धांजली, कुटुंबियांशी भेट व सांत्वन. दुपारी 12 वा. नांदगांव खंडेश्वर येथून शासकीय मोटारीने अमरावतीकडे प्रयाण. दुपारी 12.45 वा. शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे आगमन व अभ्यागतांना भेटी. दुपारी 3 वा. स्थानिक विविध कार्यक्रमास उपस्थिती. सायं 7 वा. परीगणित कॉलनी, शामनगर येथे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीबाबत बैठक. रात्री 8 वा. बालाजी मंगल कार्यालयामागे, दस्तुरनगर, येथे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीबाबत बैठक. सोयीनुसार राठीनगर निवासस्थान येथे आगमन व मुक्काम.
            दि.21 सप्टेंबर, 16 रोजी सकाळी 10 वाजता राठीनगर येथून शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व सकाळी 11 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व अभ्यागतांना भेटी. दुपारी 2 वा. स्थानिक विविध कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 7 वा. राठी होस्टेलच्या मागे, गाडगेनगर अमरावती येथे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीबाबत बैठक. रात्री 8 वा. सरस्वती नगर, कॉटन मार्केटच्या मागे, अमरावती येथे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीबाबत बैठक व सोयीनुसार राठीनगर निवासस्थान येथे आगमन व मुक्काम.
            दि.22 सप्टेंबर, 16 रोजी सकाळी 9.50 वा. राठीनगर येथून प्रयाण. सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यत मराठा क्रांती मोर्चा मध्ये सहभाग. सायं. 7 वा. रामकृष्ण कॉलनी, डेन्टल कॉलेज समोर अमरावती येथे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीबाबत बैठक. रात्री 8 वा. गाडगे नगर, अमरावती येथे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीबाबत बैठक. सोयीनुसार राठीनगर निवासस्थान येथे आगमन व मुक्काम.
            दि.23 सप्टेंबर, 16 रोजी दुपारी 2 वा. राठीनगर येथून स्थानिक विविध कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 5 वा. राठीनगर अमरावती येथे आगमन व राखीव. सायं 7.15 वा. राठीनगर येथून बडनेरा रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. सायं.7-57 वाजता विदर्भ एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.

00000
पालकमंत्री प्रविण पोटे दि.20 ते 25 सप्टेंबर पर्यत   
अमरावती जिल्हा दौऱ्यावर
            अमरावती, दि.19 (जिमाका): अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग, खनिकर्म, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळुन) राज्यमंत्री प्रविण पोटे हे दि.20 ते 25 सप्टेंबर, 16 पर्यंत अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा तपशिल दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
            दि.20 सप्टेंबर, 16 रोजी सकाळी 5.50 वाजता मुंबईवरुन बडनेरा, अमरावती येथे आगमन व शासकीय मोटारीने राठीनगर, निवासस्थानाकडे प्रयाण. सकाळी 6.30 वा. राठीनगर निवासस्थानी आगमन व राखीव. सकाळी 10 वा. राठीनगर येथून शासकीय वाहनाने नांदगांव खंडेश्वर, जि.अमरावती कडे प्रयाण. सकाळी 10.45वा. नांदगांव खंडेश्वर येथे शहीद विकास जानराव उईके या जवानास श्रद्धांजली, कुटुंबियांशी भेट व सांत्वन. दुपारी 12 वा. नांदगांव खंडेश्वर येथून शासकीय मोटारीने अमरावतीकडे प्रयाण. दुपारी 12.45 वा. शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे आगमन व अभ्यागतांना भेटी. दुपारी 3 वा. स्थानिक विविध कार्यक्रमास उपस्थिती. सायं 7 वा. परीगणित कॉलनी, शामनगर येथे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीबाबत बैठक. रात्री 8 वा. बालाजी मंगल कार्यालयामागे, दस्तुरनगर, येथे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीबाबत बैठक. सोयीनुसार राठीनगर निवासस्थान येथे आगमन व मुक्काम.
            दि.21 सप्टेंबर, 16 रोजी सकाळी 10 वाजता राठीनगर येथून शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व सकाळी 11 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व अभ्यागतांना भेटी. दुपारी 2 वा. स्थानिक विविध कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 7 वा. राठी होस्टेलच्या मागे, गाडगेनगर अमरावती येथे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीबाबत बैठक. रात्री 8 वा. सरस्वती नगर, कॉटन मार्केटच्या मागे, अमरावती येथे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीबाबत बैठक व सोयीनुसार राठीनगर निवासस्थान येथे आगमन व मुक्काम.
            दि.22 सप्टेंबर, 16 रोजी सकाळी 9 वा. राठीनगर येथून शेंदुरजना बाजार, ता. तिवसा कडे प्रयाण व सकाळी 10 वा. श्री संत अच्युत महाराज संस्था, श्री क्षेत्र शेंदुरजना बाजार ता. तिवसा येथे श्री संत अच्युत महाराज यांच्या चतुर्थ पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वा. शेंदुरजना बाजार येथून अमरावती कडे प्रयाण व दुपारी 2 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व अभ्यागतांना भेटी. सायं. 4 वा. स्थानिक विविध कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 7 वा. रामकृष्ण कॉलनी, डेन्टल कॉलेज समोर अमरावती येथे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीबाबत बैठक. सोयीनुसार राठीनगर निवासस्थान येथे आगमन व मुक्काम.
            दि.23 सप्टेंबर, 16 रोजी दुपारी 2 वा. राठीनगर येथून स्थानिक विविध कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 7 वा. मोतीनगर, लाईन नं.7 अमरावती येथे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीबाबत बैठक व सोयीनुसार राठीनगर निवासस्थान येथे आगमन व मुक्काम.
दि.24 सप्टेंबर, 16 रोजी दुपारी 2 वा. राठीनगर येथून स्थानिक विविध कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 7 वा. अर्जून एम्पायर, शिलांगण रोड, शितलामाता मंदिराजवळ, अमरावती येथे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीबाबत बैठक. सायं.7-30 वा. कथळकर, व्यंकटेश लॉनच्या मागे, अमरावती येथे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीबाबत बैठक. रात्री 8 वा. एचव्हीपीएमच्या मागे, अमरावती येथे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीबाबत बैठक व सोयीनुसार राठीनगर निवासस्थान येथे आगमन व मुक्काम.
दि. 25 सप्टेंबर 16 रोजी सकाळी 12 वा. राठीनगर येथून शासकीय विश्रामगृह अमरावती येथे आगमन व अभ्यागतांना भेटी. दुपारी 2 वा. स्थानिक विविध कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 5 वा. राठीनगर अमरावती येथे आगमन व राखीव. सायं 7.15 वा. राठीनगर येथून बडनेरा रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. सायं.7-57 वाजता विदर्भ एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
00000

काचावार/कोल्हे/19-09-2016/18-56 वाजता
शहीद पंजाब उर्फ विकी जानराव उईके यांचा संक्षिप्त परिचय
       अमरावती, दि.19 (जिमाका) : उरी येथील दहशतवादी हल्यात शहीद झालेले जिल्ह्याचे सुपुत्र यांचा संक्षिप्त परिचय.
नाव : श्री पंजाब उर्फ विकी जानराव उईके
वय : 26 वर्षे
जन्म दि. : 7 सप्टेंबर 1990
आईचे नाव : सौ. बेबी
वडीलांचे नाव : श्री जानराव उईके (माजी सैनिक-भारतीय सेना)
सेवा : 30 वर्षे
भरतीचे ठिकाण : चंद्रपुर 2009
आर्मी पोस्टींग :    2009 रेजीमेंट बिहार बटालीयन
ट्रेनिंग- उडीसा
चायना बॉर्डर- आसाम
न्युजलपैईगुडी
व आता जम्मु काश्मीर उरी येथे सेवेत रुजु होते.
भाऊ : एक, वय - वर्ष 30
बहिण : प्रिती (विवाहित)
जवाई : गजानन इरपाते (बीएसएफ मध्ये कार्यरत कच्छ- गुजरात)
          पंजाब उर्फ विकी यांचे तीन दिवसापुर्वीच घरच्यांशी संवाद झाला होता.
00000

वाघ/गावंडे/कोल्हे/दि.19-09-2016/16-20 वाजता
कुष्ठरोग शोध मोहिमेतंर्गत भव्य सायकल स्वास्थ्य रॅलीला
जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दाखविली हिरवी झेंडी
          अमरावती, दि.19 (जिमाका) : जिल्ह्यात दि.19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोंबर 16 दरम्यान कुष्ठरोग शोध मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत सोमवार दि.19 सप्टेंबर 16 रोजी सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग), विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन व डॉ. गोविंद कासट मित्र मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 8.30 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्विन चौक) ते विदर्भ महारोगी सेवा मंडळ, तपोवन पर्यत सायकल स्वास्थ्य रॅली काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी रॅलीला हिरवी झेंडी शुभारंभ केला.
          रॅलीच्या उद्धाटनाप्रसंगीत सह संचालक कुष्ठरोग पुणे डॉ. संजीव कांबळे, डॉ. टी. एम. आऊलवार, लाएन्स प्रिमियम अध्यक्ष डॉ. पंकज घुंडीयाल,जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अरुण राऊत, वरिष्ठ समाज सेवक डॉ. गोविंद कासट प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थित मान्यवर व सायकल रॅली मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व सायकल चालविणाऱ्यांना कुष्ठरोग शोद मोहिमेचा संदेश देणारी कॅप देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. दि. 4 ऑक्टोंबर 16 पर्यत राबविण्यात येणाऱ्या मोहिमेतंर्गत आशा स्वयंसेवक व क्षेत्रीय कर्मचारी यांचे मार्फत घरोघरी भेट देऊन घरातील प्रत्येक सदस्याची तपासमी व जनजागृती करण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान घरी येणाऱ्या टीमला सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.
          यावेळी माजी आमदार सुलभा खोडके, वऱ्हाड विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष संजय खोडके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. निकोस, तपोवन अध्यक्ष डॉ. मोतीलाल राठी, उपाध्यक्ष डॉ. अतुल आळशी, सचिव वसंत बुटके, वैद्यकिय अधिकारी डॉ. अकुंश सिरसाट, डॉ. प्रतिभा बोरखेडे, राजू डांगे, मेघा बोबडे, सुवर्णा धर्माळे, सुजाता नवले, डॉ. बबन वैराळे, मनोज जोशी, जोसेफ टीएलएम कोठारा, डॉ. विनोद करंजेकर, उमेकर, विनोद प्रधान, संतोष देशमुख, दीपक गडलींग, शाम इंगळे, रितेश ठाकरे यांच्यासह एनएमए, आरोग्य विभागाचे अधिकारी, व कर्मचारी, तपोवन संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी, गायत्री नर्सींग स्कुल, डॉ. गोविंद कासट मित्र मंडळीचे सदस्य, अदिम ग्रुप, जेसीआय गोल्डन चे पदाधिकारी रॅलीत सहभागी होते.
          रॅलीचा समारोप विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन येथे करण्यात आला. संपुर्ण कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय प्रशिक्षक जेसीआय राजू डांगे यांनी केले.
00000

वाघ/गावंडे/सागर/दि.19-09-2016/17-10 वाजता



Tuesday, September 20, 2016

शहीद विकास उईके यांचे पार्थिव हेलिकॉप्टरने येणार
          अमरावती, दि.19 (जिमाका) : उत्तर कश्मीर मधील ऊरी येथे झालेल्या दहशतवादी हल्यातील शहिद व अमरावतीचे सुपुत्र शहीद विकास जानराव उईके यांचे यांचे पार्थिव आज सायंकाळपर्यंत नाशिकवरुन विशेष हेलिकॉप्टरने नागपूर व तेथून अमरावती मार्गे नांदगाव खंडेश्वर येथे आणण्यात येणार आहे. पालकमंत्री प्रविण पोटे व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दखल घेवून याबाबत वरिष्ठस्तरावर संपर्क केला. पार्थिव विशेष विमानाने सोनेगाव (नागपूर) येथील एअर फोर्सच्या बेसवर आणण्यात येईल. जिल्हा प्रशासनातर्फे तहसिलदार व नातेवाईक लष्करांकडून शहीद विकास उईके यांचे पार्थिव स्विकारतील व पार्थिव नांदगाव येथे आणण्यात येईल. याबाबतीत जिल्हा प्रशासन वरिष्ठांच्या संपर्कात असुन आज सायंकाळपर्यंत उईकेंचे पार्थिव येईल असे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सांगितले.
00000

वाघ/गावंडे/दि.19-09-2016/15-13 वाजता
शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे
22 सप्टेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर
          अमरावती, दि.19 (जिमाका) : शालेय शिक्षण आणि क्रीडा, उच्च व तंत्रशिक्षण, अल्पसंख्यांक व वक्फबोर्ड, मराठी भाषा व सांस्कृतीक कार्यमंत्री विनोद तावडे हे दि.22 सप्टेंबर, 16 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
          दि.22 सप्टेंबर, 16 रोजी सकाळी 9 वाजता शासकीय तंत्रनिकेतन सभागृह येथे शिक्षण क्षेत्रात उद्भवणाऱ्या समस्या व संभ्रमावस्था विषयावर मागर्दर्शन, चर्चा सत्रास उपस्थित राहतील. सकाळी 10-30 वाजता संत गाडगेबाबा विद्यापिठ अमरावती येथे व दुपारी 12 वाजता वसंत हॉल पोलिस कवायत मैदान जवळ वरील विषयावरच मागर्दर्शन, चर्चा सत्रास उपस्थित राहतील. तीन ठिकाणी होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये शिक्षण क्षेत्रात उद्भवणाऱ्या समस्या व संभ्रमावस्था या विषयावर वैचारीक मंथन होणार आहे. दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेला उपस्थित राहतील व सायं.7 वाजता अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.
00000

वाघ/गावंडे/दि.19-09-2016/13-40 वाजता
महावितरण कामकाजाचा
पालकमंत्री प्रविण पोटे यांच्याकडून आढावा
          अमरावती, दि.18 (जिमाका – येथील महावितरण विभागाकडून कार्यान्वित करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनांकरीता विज कनेक्शन साठी कृषि फिडरवरुन गावठाण फिडरवर शिफ्ट करण्याबाबत पालकमंत्री प्रविण पोटे पाटील यांनी महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

            यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते, महावितरणचे मुख्य अभियंता सुहास रंगारी, अन्य कार्यकारी अभियंता यावेळी उपस्थित होते.

            दिन दयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना फेज-1, एकात्मिक ऊर्जा विकास योजना, पायाभूत आराखडा आदी योजनांसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून मंजुर करण्यात आलेल्या जमिनीची योजना व गांव निहाय माहिती यावेळी पालकमंत्र्यांना देण्यात आली. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता योजनांची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सुचना यावेळी ना. पोटे यांनी केल्या.
00000

काचावार/सागर/दि.18-09-2016/14 वा.


कुष्ठरोग निर्मुलनाकरीता
आता घरोघर सर्व्हेक्षण व प्रत्यक्ष तपासणी
          अमरावती, दि.17 (जिमाका):  कुष्ठरोग हा जंतुमार्फत होणारा व हवेच्या माध्यमातुन पसरणारा सामान्य आजार असला तरी समाजामध्ये कुष्ठरोगाविषयी अंधश्रद्धा व भिती आहे. त्यामुळे कुष्ठरोग झालेली व्यक्ती आपा आजार लपविते व त्यामुळे कुष्ठरोगाचा प्रसार होण्यास मदत होते. त्यामुळे अश्या लपलेल्या कुष्टरुग्णांना दुरीकरणाचे ध्येय साध्य करण्यासाठी केंद्र शासनाने दि. 19/9/16 ते 4/10/16 या कालावधीत कुष्ठरोग शोध अभियान राबविण्याचे निर्देश आरोग्य यंत्रणेला दिलेले आहेत.
            महाराष्ट्र राज्यात अमरावतीसह 16 जिल्ह्यामध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत संपुर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये एक आशा कर्मचारी व एक पुरुष कर्मचारी/स्वयंसेवक यांची चमु दर दिवशी घरोघरी भेटी देवुन कुष्टरोगाविषयी संक्षिप्त माहिती देतील व घरातील प्रत्येक व्यक्तीची शारिरीक तपासणी करतील.
            पालकमंत्री प्रवीण पोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, जि.प. उपाध्यक्षसतीश हाडोळे, महापौर चरणजीत कौर नंदा, जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. डॉ. किरण कुलकर्णी, मनपा आयुक्त हेमंत पवार, आय.एम.ए.अध्यक्ष डॉ. वसंत लुंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन भालेराव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. तुकाराम आऊलवार तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गोविंद कासट यांनी अभियानाच्या यशस्वीतेकरीता शुभेच्छा देत सर्व नागरिकांना या अभियानामध्ये उत्स्फुर्तपणे सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. अशी माहिती वैद्यकिय अधिकारी (कुष्ठरोग) डॉ. अंकुश सिरसाट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.  
00000
काचावार/दि.17-09-2016/19-20 वा.


शालेय विद्यार्थ्यांकरीता आधार नोंदणी
जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याहस्ते शुभारंभ
·        गणेशोत्सव दरम्यान अमरावती जिल्ह्यात 21234 आधार नोंदणी
·        ज्यांनी आधार नोंदणी केली नाही त्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन
·        जीवनभरासाठी आधार कार्ड उपयुक्त
·        आधार नोंदणीसाठी अडवणूक करणाऱ्या ऑपरेटर्स ची मान्यता रद्द करणार
          अमरावती, दि.16 (जिमाका):  शासनाच्या सुमारे 150 विविध प्रकारच्या योजना असून या योजनांचा लाभ मिळण्यासाठी तसेच शिधापत्रिका,पासपोर्ट, शाळेचा दाखला, आदी सर्वच कामासाठी सर्वच कामासाठी देशात तसेच जगभरात कोठेही जीवनभर आधार कार्ड उपयुक्त आहे. अद्यापही अमरावती जिल्ह्यात सुमारे 50 हजार विद्यार्थी आधार कार्ड नोंदणीपासून दूर आहेत. यासाठी तातडीने महानगर पालिका, जिल्हा परिषद तसेच सर्व शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थी, विद्यार्थीनी, सर्वसामान्य नागरिक यांनी आधार कार्ड नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले आहे.
            येथील पठाण चौकातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शालेय विद्यार्थ्यांकरीता आयोजित आधार नोंदणी कँप चा शुभारंभ गित्ते यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते. निवासी उप जिल्हाधिकारी मोहन पातूरकर, तहसिलदार बगळे, मनपाचे शिक्षण सभापती अरिफ हुसेन, नगर सेवक हमिद, शिक्षणाधिकारी  श्रीराम पानझाडे आदी उपस्थित होते. 
            पठाण चौकातील जिल्हा परिषद शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करण्यासाठी पाच मशिन उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. पुढील 2-3 दिवस हे काम चालू राहाणार आहे. यासाठी सर्व शिक्षकांनी तसेच संबंधित पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण आधार नोंदणी होईल याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले.
            पठाण चौकातील जिल्हा परिषदेची शाळा ही ब्रिटिश कालिन असून या शाळेची सध्या दुरावस्था झाली आहे. ऐतिहासिक अशा या इमारतीस पूर्ववैभव प्राप्त करुन देण्यासाठी आवश्यकती रंगरंगोटी आणि दुरुस्ती करण्यात येईल. तसेच शाळेच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी यादी तयार करावी त्यास येत्या जून,2017 पूर्वी दुरुस्ती करण्यात येईल.
आधार नोंदणीसाठी अडवणूक करणाऱ्या ऑपरेटर्सवर कारवाई करणार
            जिल्हाधिकारी म्हणाले की, ज्यांना आधार नोंदणीचे काम दिले आहे त्या ऑपरेटर्सनी नागरिकांकडून आधार नोंदणीसाठी पैशाची मागणी केली किंवा अडवणूक केली. लोकांशी उध्दटपणे वागल्यास त्यांची मान्यता तात्काळ रद्द करण्यात येईल व त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशाराही  जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
00000

काचावार/दि.16-09-2016/14-30 वा.





बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे - जिल्हाधिकारी आशिष येरेकर

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे    - जिल्हाधिकारी आशिष येरेकर *उद्दिष्ट प...