Tuesday, September 20, 2016

रद्द/व्यपगत झालेल्या टॅक्सीच्या परवान्यांचे नुतनीकरण करण्यासाठी
दि. 31 ऑक्टोंबर पर्यत मुदतवाढ
          अमरावती, दि.19 (जिमाका): गृहविभागाने (परिवहन) दि.10 जून 16 रोजी च्या शासन आदेशानुसार राज्यातील रद्द/व्यपगत झालेल्या टॅक्सीच्या परवान्याचे नुतनीकरण करण्यासाठी टॅक्सी परवाना धारकांना दि.15 जुलै 16 पर्यत मुदत देण्यात आली होत. तथापी, शासन निर्णय दि. 29 ऑगस्ट 16 च्या आदेशानुसार कालमर्यादेमध्ये सुधारणा करुन रद्द/व्यपगत झालेल्या टॅक्सी परवान्यांचे नुतनीकरण करुन घेण्याकरीता दि. 31 ऑक्टोंबर 16 पर्यत शेवटची संधी म्हणुन मुदत देण्यात आली आहे.
          दि.31 ऑक्टोंबर 16 पर्यत जे परवानाधारक परवाने नुतनीकरण करणार नाहीत. त्यांचे परवाने कायमचे रद्द करण्यात येतील. करीता सर्व टॅक्सी चालक-मालक यांनी सुधारित कालमर्यादेत टॅक्सी परवाना नुतनीकरण करुन घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती यांनी केले आहे.   
00000
वाघ/कोल्हे/दि.19-09-2016/17.20 वाजता

                                                

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार