Saturday, September 10, 2016

सिडीटीपी अंतर्गत प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न
            अमरावती, दि.7 (जिमाका) : मानव संसाधन विकास मंत्रालयांतर्गत कम्युनिटी डेव्हलपमेंट टु पॉलीटेक्नीक योजना शासकीय तंत्रनिकेतन अमरावती येथे राबविण्यात येते. योजनेच्या अंतर्गत विविध विस्तार केंद्र यावली शहीद,अडगांव कारला, लोणी, सावळापुर तसेच मुख्य केंद्र अमरावती येथील फोटोग्राफी एन्ड विडियोग्राफी, मोबाईल रिपेरिंग, इलेक्ट्रीशीयन, इलेक्ट्रीक मोटार रिवायडींग, ट्रॅक्टर मेकेनिक या सहा महिने कालावधीच्या प्रशिक्षण पुर्ण केलेल्या एकुण 150 प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ए. वी. उदासी, प्रकल्प समन्वयक प्रा. एस. जे. गायकवाड, प्रा. एस. पी. पासेबंद, प्रा. पी. जी. उत्तरवार, ओम बापट उपस्थित होते. कार्यक्रम संस्थेचे प्राचार्य एन. शिंगाडे, योजनेचे प्रकल्प समन्वयक प्रा. एच. बी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
                                                                        00000
वाघ/कोल्हे/दि.07-9-2016/14-40 वाजता


No comments:

Post a Comment

भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येथे येणार.

  भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येथे येणा...