खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी ई-आर-1
सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत
अमरावती, दि. 08 (जिमाका) : उद्योजक,
आस्थापना यांनी त्रैमासिक ई-आर-1 ऑनलाईन सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2024 पर्यंत
आहे. सर्व खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी यासाठी ऑनलाईन सुविधांचा लाभ
घ्यावा. ई-आर-1 ऑनलाईन सादर न करणाऱ्या कसूरदार आस्थापनावर विहित कायद्यान्वये कार्यवाही
करण्यात येणार आहे. याची संबंधितांनी नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार
व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय
यांच्याकडून पुरविण्यात येणाऱ्या रोजगारविषयक सर्व सेवा आता ऑनलाईन करण्यात आलेल्या
आहेत. या सुविधांसाठी
www.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. तसेच उद्योजक व
आस्थापना यांनी सेवायोजन कार्यालय (रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारे) कायदा
1959 व नियमावली 1960 कलम 5 (1) व कलम 5 (2) अन्वये त्रैमासिक ई-आर-1 ऑनलाईन सादर करणे
बंधनकारक आहे. 31 जून 2024 अखेर संपणाऱ्या त्रैमासिक ई-आर-1 ऑनलाईन या प्रपत्राची माहिती
वरील संकेतस्थळावर सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी उद्योजक, आस्थापना यांनी त्यांचे
युजर आयडी व पासवर्डच्या माध्यामातून लॉगिन करून ऑनलाईन सादर करावयाची आहे. ऑनलाईन
ई-आर-1 सादर करतांना काही अडचण असल्याच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्र, या कार्यालयाशी संपर्क साधावा. किंवा दुरध्वनी क्रमांक 0721-2566066 यावर संपर्क
साधावा.
000000
No comments:
Post a Comment