कडधान्य व तेलबिया
खरेदीसाठी ई-समृद्धी पोर्टलवर नोंदणी करा; जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांचे आवाहन
अमरावती, दि. 11 (जिमाका) : आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत नाफेडमार्फत
कडधान्य व तेलबियांची खरेदी केली जाते. शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी ई-समृद्धी पोर्टल
सुरु केले आहे. शेतकऱ्यांनी नाफेडमार्फत राबविण्यात येणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ
घेणेसाठी ई-समृध्दी पोर्टलवर नाव नोंदणी करुन आपल्या शेतमालाची एमएसपी दराने
विक्री करण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोदणी करावी,असे आवाहन जिल्हा
मार्केटिंग अधिकारी यांनी केले आहे.
हंगाम
2024-25 साठी मका, मुंग, उडिद, सोयाबीन, तुर, चना या कडधान्य व तेलबियांचे
बाजारभाव आधारभूत दरापेक्षा जास्त असल्यामुळे हमीभावाने खरेदी झालेली नाही.
आधारभूत किंमतीनुसार कडधान्य व तेलबियांचे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी शासनाने
सुरु केलेल्या ई-समृद्धी पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. पोर्टलवर नोंदणी करतांना अडचणी आल्यास अथवा अधिक
माहितीतीसाठी ई-समृध्दी पोर्टलचे प्रतिनिधी स्वप्निल ढोले (7020367294) व सुयोग
गिरकर (8329634527) यांच्याशी संपर्क साधावा.
00000
No comments:
Post a Comment