Tuesday, July 23, 2024

उर्ध्व वर्धा धरणातून पाणी सोडण्याच्या सूचना; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 

उर्ध्व वर्धा धरणातून पाणी सोडण्याच्या सूचना;

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 

          अमरावती, दि. 23 (जिमाका): उर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्र मध्ये पाऊस सुरू असल्यामुळे धरणाच्या जलाशय पातळीत वाढ होत आहे. दि. 23 जुलै 2024 रोजी उर्ध्व वर्धा प्रकल्पाची 11 वाजता जलाशय पातळी 339.40 मी. असून पाणी साठ्याची टक्केवारी 56.74 इतकी आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या व अपेक्षित पर्जन्यमानाचा विचार करता येत्या 48 ते 72 तासात धरणातून नदीपात्रात येणाऱ्या पाण्याच्या येव्या प्रमाणे विसर्ग सोडण्यात येण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने वर्धा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी दिला आहे.

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...