बांबू रोपाची लागवड करून बांबु मिशन अभियानची सुरूवात
अमरावती, दि. 02 (जिमाका): महात्मा गांधी
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत जिल्ह्यात बांबू मिशन अभियान राबविण्यात
येत आहे. त्याअनुषंगाने जिल्हधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी सौरभ कटियार
यांच्या हस्ते बांबू लागवड करून बांबू मिशनचा शुभारंभ करण्यात आला.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार
हमी योजनेतंर्गत जिल्ह्यासाठी बांबू लागवडीचे 8 हजार हे.चे उद्दिष्ट असून उद्दिष्ट
पूर्ण करण्यासाठी पंचायत समिती कृषी विभाग, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभाग, सामाजिक
वनिकरण विभागाकडे जबाबदारी देण्यात आली आहे. शासन निर्णय दि. 27 जून 2024 अन्वये महात्मा
गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतंर्गत 1 हेक्टर क्षेत्रावर 3x3 मीटर अंतरावर वैयक्तिक
बांबू लागवड व सार्वजनिक बांबू लागवडकरिता 4 वर्षाचे संगोपनासाठी 7 लक्ष 4 हजार
646 रुपये व 3x3 मीटर अंतरावर वैयक्तिक शेत बांधावर बांबू लागवडकरिता 4 वर्षाच्या संगोपनासाठी
84 हजार 274 रुपये अंदाजपत्रकास मान्यता प्रदान केली आहे.
बांबू लागवडीचे अनुषंगाने तालुकास्तरीय
यंत्रणानी बांबू रोपान व संगोपनासाठी बांबू मिशन अभियान जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत
पोहोचवावी. बांबू लागवडीबाबत शेतकऱ्यामध्ये असलेले संभ्रम दुर करून बांबू लागवडीमुळे
कसा फायदा होवून शकतो, याबाबत तालुकास्तरावर प्रचार व प्रसार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी
सौरभ कटियार यांनी दिले.
0000
No comments:
Post a Comment