महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यास दि.15
जुलैपर्यंत मुदतवाढ
अमरावती दि. 02 (जिमाका): सामाजिक न्याय विभागामार्फत महाडीबीटी प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास
सोमवार दि. 15 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती समाजकल्याण सहायक आयुक्त
माया केदार यांनी कळविले आहे.
सामाजिक न्याय विभागामार्फत महाडीबीटी
प्रणालीवर अनुसूचित जाती, प्रवर्गांसाठी भारत
सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी योजना, राजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रम संलग्न्न
वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता व व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतीपूर्ती योजना
अशा विविध योजना राबविण्यात येतात.
माहिती व तंत्रज्ञान विभागमार्फत सन
2023-24 वर्षातील महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती प्रवर्गातील नवीन अर्ज भरण्यासाठी तसेच सन 2022-23 साठी रि-अप्लाय करण्यासाठी दि. 15 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑनलाईन नुतनीकरणाचे अर्ज विहित
मुदतीत भरण्यासाठी
https://mahadbtmahait.gov.in महाडीबीटीच्या
या संकेतस्थळावर ऑनलाईन नुतनीकरणाचे अर्ज तसेच विद्यार्थ्यांच्या लॉगिनमधील त्रुटी पुर्ततेसाठी सेंड बँक केलेल्या
अर्जाची संबंधित महाविद्यालयानी त्वरीत त्रुटिपूर्तता करुन जिल्हा लॉगीन वर पाठविण्यात यावे. विहित वेळेत
अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहील.
महाडीबीटी संकेतस्थळावर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी
तसेच महाविद्यालयांना नुतनीकरणाचे अर्ज भरुन रि-अप्लाय करण्यासाठी आणि सेंड बॅक केलेल्या
अर्जाची त्रुटी पूर्तता करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाव्दारे करण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment