Monday, July 22, 2024

सर्वोच्च न्यायालयात 29 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान विशेष लोकअदालत सप्ताह

 

सर्वोच्च न्यायालयात 29 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान विशेष लोकअदालत सप्ताह


अमरावती, दि. 22 (जिमाका): नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात दि. 29 जुलै ते 3 ऑगष्ट दरम्यान विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पक्षकारांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यास त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम.डी. कांबळे यांनी केले आहे.

 

न्यायालयातील तडजोड पात्र प्रलंबित प्रकरणे आपसी मामजस्यातून तडजोडीद्वारे निकाली काढण्याकरिता लोक अदालत हे प्रभावी माध्यम म्हणून समोर आले आहे. लोक अदालतीच्या माध्यमातून अनेक पक्षकारानी आपली प्रकरणे तडजोडीद्रारे निकाली काढली आहेत. लोक अदालतीमध्ये तडजोडीदार निकाली निघालेल्या प्रकरणांमुळे प्रस्तंवित प्रकरणातील पक्षकार याच्यासोबतच शासन आणि समाज या दोन्ही घटकांना मोठा लाभ प्राप्त झाला आहे.  लोक अदालतीमुळे न्यायालयातील प्रलवित खटल्यांची संख्या कमी करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश आले आहे. लोक अदालतीचे यश लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने प्रलबित असलेली तडजोडपात्र प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्याकरिता विशेष लोक अदालत सप्ताहाने आयोजन २९ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत केले आहे. 

 

सर्वोच्च न्यायालयाने लोकअदालतीमध्ये ठेवलेल्या प्रकरणांची यादी

https://legalservices.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/MAHARASHTRA.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी ज्यांची प्रकरणे सदरील यादीमध्ये असतील त्यांनी स्वत: किंवा वकीलामार्फत महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिरकरण, अमरावती येथील 8591903627 या क्रमांकावर संपर्क साधावा.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...