मागास
प्रवर्गातील मुलामुलींना परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती; 15 जुलैपर्यंत मुदतवाढ
अमरावती, दि. 05 (जिमाका): विमुक्त जाती,
भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील मुलामुलींना परदेशातील
शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. सन
2024-25 करीता 75 विद्यार्थ्यांसाठी दि.
30 जून 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. या योजनेस मिळालेला प्रतिसाद विचारात
घेऊन 15 दिवसांची म्हणजेच दि. 15 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शिष्यवृत्ती
योजनेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे
प्रादेशिक उपसंचालक विजय साळवे यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment