Wednesday, July 10, 2024

‘सिमी’ संघटनेवर बंदी; केंद्र शासनाचे अधिकार राज्यानाही वापरण्याचे निर्देश

 

‘सिमी संघटनेवर बंदी; केंद्र शासनाचे अधिकार राज्यानाही वापरण्याचे निर्देश

          अमरावती, दि. 10 (जिमाका): बेकायदेशीर कृत्ये अधिनियमानुसार ‘स्टुडंटस् इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’ (सिमी) या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम, 1967 कायद्याच्या कलम 42 द्वारे प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करतांना केंद्र सरकारने 5 फेब्रुवारी 2024 च्या अधिसुचनेनुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासन देखील या कायद्याच्या कलम 7 आणि कलम 8 अंतर्गत केंद्र सरकारद्वारे वापरता येणारे अधिकार वापरतील असे निर्देश दिले आहे. याविषयी राज्य शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कायद्याच्या तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहे. तसेच संबंधितांवर न्यायाधिकरणाची नोटीस बजावण्याबाबतची कार्यवाही करावी. कार्यवाहीबाबत शपथपत्रे दाखल करून ती राज्य शासनाकडे जमा करण्याचे आदेश शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी अनिल भटकर यांनी पत्राव्दारे कळविली आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...