Friday, July 12, 2024

चांदूर रेल्वे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

 

चांदूर रेल्वे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे

शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

          अमरावती, दि. 12 (‍जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत चांदूररेल्वे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात सन 2024-25 साठी प्रवेश प्रक्रीया सुरु झाली आहे. प्रवेशाबाबतचे अर्ज कार्यालयात विनामुल्य उपलब्ध असून वरिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांनी दि. 31 जुलैपर्यंत अर्ज करावा, असे आवाहन वसतीगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.

           वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार अनुज्ञेय सर्व सोई-सुविधा मोफत पुरविण्यात येतात. वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना दरमहा निर्वाह भत्ता, स्टेशनरी, नास्ता, भोजन, निवास,इ. सोई-सुविधा मोफत पुरविण्यात येतात.

000000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 10.06.2026

  शुक्रवारी जागतिक बाल कामगार प्रथाविरोधी दिन अमरावती, दि. 10 (जिमाका) : बालमजुरी या अनिष्ठ प्रथेविरूद्ध विस्तृत प्रमाणात जनजागृती करणे आवश्...