पंडित
दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 206 उमेदवारांची विविध पदांवर
प्राथमिक निवड
अमरावती, दि.31 (जिमाका): जिल्हा कौशल्य
विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने
नुकतेच शासकिय औद्योगीक प्रशिक्षण संस्था, चिखलदरा येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार
मेळावा संपत्र झाला.या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 206 उमेदवारांची विविध पदांवर प्राथमिक
निवड करण्यात आली असून या रोजगार मेळाव्यामध्ये नोकरी इच्छुक उमेदवारांचा उत्स्फूर्त
प्रतिसाद मिळाला.
ऑनलाइन,
ऑफलाईन प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 436 उमेदवारांनी सहभाग घेतला. त्यापैकी 370 उमेदवारांनी
प्रत्यक्ष येऊन मुलाखती देऊन 206 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. कार्यक्रम
प्रसंगी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे अभिषेक ठाकरे, औद्योगिक
प्रशिक्षण संस्थचे प्राचार्य श्री. काळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या
मेळाव्यामध्ये श्रीधर स्पीनर प्रा.लि अमरावती, जाधव गिअर्स लि. अमरावती, पिपल ट्री
व्हेंचर्स प्रा.लि. अमरावती, रेडीयंट सुपरस्पेशालीटी हॉस्पीटल, अमरावती, धुत ट्रान्समिशन
छ. संभाजीनगर, सावन हेल्थ सेंटर अमरावती, श्रॉफ इंडस्ट्रीज, अमरावती या खाजगी आस्थापनेचे
प्रतिनिधीनी उपस्थित राहून उमेदवाराच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या.
पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे
मान्यवरांच्या हस्ते दिप प्रचलन करुन उद्घाटन करण्यात आले. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण
संस्थचे श्री मारशेटवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर कार्यक्रमाचे संचालन
श्री. देशमुख यानी केले. आभार प्रदर्शन श्री. कोल्हे यानी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावती व शासकिय औद्योगीक
प्रशिक्षण संस्था चिखलदरा येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
00000
No comments:
Post a Comment