मतदार जनजागृती
रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण
अमरावती,
दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने शिराळा येथे मतदार जनजागृती रॅली काढली. या रॅलीत
सजविलेली बैलगाडी नागरिकांचे आकर्षण ठरली. या रॅलीत जिल्हा नोडल अधिकारी तथा मुख्य
कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र
यांनी सहभागी होत मतदार चिठ्ठीचे वाटप केले.
शिराळा
गावात रॅली काढण्यात आली. उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून रॅलीचे उद्घाटन करण्यात
आले. सहभागी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’
अशा घोषणा दिल्या. गावफेरीत मतदार चिठ्ठीचे वाटप करण्यात आले. रॅलीत उपमुख्य कार्यकारी
अधिकारी विलास मरसाळे यांच्यासह अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, आशा सेविका, शिक्षक
आदींनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. उपस्थितांना मतदान करण्याची शपथ देण्यात आली.
विस्तार
अधिकारी योगेश वानखडे, कल्पना ठाकरे, आशिष गाडेकर, मंगेश मानकर, राजेश श्रीखंडे, आरती चिटके, जिल्हा स्वीप कक्षाचे संजय राठी, राजेश
सावरकर, हेमंतकुमार यावले, अमरावती तालुका स्वीप कक्षाचे विनायक लकडे यांनी कार्यक्रमासाठी
पुढाकार घेतला.
00000
अमरावती विधानसभा
क्षेत्रात एका उमेदवाराला नोटीस
*खर्च सादर करण्याचे
निर्देश
अमरावती,
दि. 13 (जिमाका) : अमरावती विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशित उमेदवारांच्या खर्चाची
दुसरी तपासणी सोमवार, दि. 11 नोव्हेंबर रोजी पार पडली. अनुपस्थित राहिलेल्या एका उमेदवारांला
नोटीस देऊन 48 तासाच्या आत खर्च सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
लेख्यांच्या
दुसऱ्या तपासणीवेळी एकूण 22 उमेदवारांपैकी 21 उमेदवार उपस्थित राहिले. त्यांनी खर्च
नोंदवह्या उपलब्ध करून दिल्या. तसेच एकुण 1 उमेदवार किंवा त्यांचा प्रतिनिधी अनुपस्थित
होते. तसेच ज्यांच्या खर्च नोंदवह्या तपासणीसाठी उपलब्ध करून दिल्या नाही, अशा उमेदवाराला
48 तासांत निवडणूक खर्चाचे लेखे संनियंत्रण कक्ष, उपविभागीय अधिकारी कार्यालय येथील
पहिल्या माळ्यावरील सभागृह, नवीन प्रशासकीय इमारत, संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनासमोर,
अमरावती येथे सादर करण्याबाबत नोटीस देण्यात आली. विहित मुदतीत खर्च सादर केला नसल्यास
नियमानुसार तक्रार दाखल करण्यात येणार आहे. तसेच देण्यात आलेल्या सर्व परवानग्या तात्काळ
रद्द करण्यात येणार आहे.
21 उमेदवारांनी
दुसऱ्या तपासणीवेळी त्यांचा दैनंदिन खर्चाचा लेखा सादर केला. 13 उमेदवार यांचा खर्च
शॅडो खर्च नोंदवहीसोबत तुलना करता खरा व योग्य वाटत नाही किंवा खर्चाचा भाग त्यांनी
केलेला नाही. त्या उमेदवारांना उपविभागीय अधिकारी
तथा निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कुमार भटकर यांनी नोटीस दिली आहे. विहीत मुदतीत
त्यांनी आपले म्हणणे सादर न केल्यास उपरोक्त शॅडो खर्च नोंदवहीनुसारचा खर्च उमेदवारांना
मान्य आहे, असे गृहीत धरून त्यांच्या निवडणूक खर्चामध्ये समाविष्ठ करण्यात येईल. सदर
तफावत उमेदवारांना मान्य असल्यास सदर खर्चाचा समावेश उमेदवारांच्या खर्च नोंदवहीत करण्यात
येईल. तफावत उमेदवारांना मान्य नसल्यास उमेदवारांनी त्यांच्या खुलाशामध्ये तो मान्य
नसल्याचा सुस्पष्ट कारणासह निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लिखीत स्वरूपात सादर
करावे लागेल. ते निवेदन खर्च निरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा खर्च संनियंत्रण
समितीसमोर सादर करण्यात येणार आहे.
दुसऱ्या
तपासणीअंती उमेदवारनिहाय खर्च हा तात्पुरत्या स्वरूपाचा असून निकालानंतर लेखा ताळमेळ
बैठकीमध्ये ताळमेळ घेऊन सदर खर्चास अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. अंतिम बैठकीनंतर
खर्चाचा ताळमेळ झाल्यानंतरच सदरचा खर्च हा भारत निवडणूक आयोगास सादर केला जाणार आहे,
असे निवडणूक निर्णय अधिकारी अनिलकुमार भटकर यांनी कळविले आहे. सदर तपासणीवेळी खर्च
निरीक्षक वेंकन्ना तेजावथ व जिल्हा खर्च संनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी विजय देशमुख
उपस्थित होते.
00000
मोर्शी विधानसभा
क्षेत्राची दुसरी खर्च तपासणी
*सर्व उमेदवारांनी
सादर केला खर्च
अमरावती,
दि. 13 (जिमाका) : मोर्शी विधानसभा मतदारसंघात
नामनिर्देशित उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी सोमवार, दि. 11 नोव्हेंबर रोजी तहसिल
कार्यालय सभागृह येथे पार पडली. यावेळी सर्व 19 उमेदवारांनी खर्च सादर केला.
दुसरी
तपासणी खर्च निरीक्षक डॉ. उमा माहेश्वरी यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली. लेख्यांच्या तपासणीवेळी एकूण 19 उमेदवारांपैकी
19 उमेदवार उपस्थित राहिले. सदर खर्च तपासणीवेळी खर्च नोंदवहीत नोंदविलेला खर्च व खर्च
सनियंत्रणन पथकाव्दारे नोंदविण्यात आलेला खर्च यात असलेली तफावत उमेवारांनी मान्य करून
उमेदवारांच्या खर्च लेख्याचा ताळमेळ घेण्यात आला. उमेदवारांच्या लेख्याची तिसरी तपासणी
दि. 15 नोव्हेंबर रोजी तहसिल कार्यालय मोर्शी
येथील सभागृहात होणार आहे.
00000
No comments:
Post a Comment