Tuesday, November 5, 2024

DIO NEWS AMRAVATI 05.11.2024

 




विधानसभा निवडणुकीत 100 टक्के वोटर स्लिप देणार

-जिल्हाधिकारी सौरभ कटियार

*बीएलओंची तक्रार आल्यास कारवाई

अमरावती, दि.5( जिमाका): विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढण्यासाठी मतदारचिठ्ठ्या प्रभावी माध्यम ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मतदारांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत  संपूर्ण मतदारांना वोटर स्लिप देण्यात येणार आहे. याबाबत सूचना देण्यात आल्या असून येत्या दोन दिवसात मतदारचिठ्ठीचे वाटप करण्यात येणार आहे. यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी, मतदारांना मतदानाआधी मतदान चिठ्ठी मिळाल्यास त्यांना आपले मतदान कोणत्या केंद्रावर आहे, याची माहिती मिळण्यास मदत होते. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्येक मतदाराच्या घरी गेल्यास त्यांना मतदानाची आवाहनही करणे शक्य आहे. प्रामुख्याने शहरी भागात मतदानाची टक्केवारी कमी असते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत ज्या भागात कमी मतदान झाले आहे, त्याच भागात प्रभावीपणे जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात यावे. या भागावर लक्ष केंद्रीत केल्यास मतदानाची टक्केवारी वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे. निवडणुकीसाठी दोन आठवड्यांचा कालावधी आहे. या कालावधीत बहुसंख्य मतदारांपर्यंत पोहोचणे शक्य आहे. महानगरपालिका क्षेत्रात मतदार जनजागृतीकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना केली.

मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांसाठी मतदान केंद्रावर सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. प्रामुख्याने पाणी आणि परिसर स्वच्छ राहील, याची दक्षता घेण्यात यावी. मतदान केंद्राबाबत प्रामुख्याने शहरी भागातून तक्रारी जादा प्रमाणात येतात. त्यामुळे याठिकाणी जादा लक्ष देण्यात यावे. प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीवेळी आलेल्या तक्रारी परत होणार नाही, यासाठी प्रयत्न करावेत. मतदान केंद्रांची नियमितपणे तपासणी करावी. याठिकाणी काही समस्या असल्यास त्या तातडीने दूर कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

00000

 




सौदार्हपूर्ण वातावरणात निवडणूक पार पाडावी

*निवडणूक निरीक्षकांच्या सूचना

अमरावती, दि. 5(जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवार अंतिम झालेले आहेत. त्यांना चिन्ह वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे आजपासून प्रचाराला सुरूवात होणार आहे. उमेदवारांना सहकार्य करण्याची भूमिका प्रशासनाने ठेवावी, तसेच उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून ही निवडणूक सौदार्हपूर्ण वातावरणात पार पाडावी, अशा सूचना निवडणूक निरीक्षकांनी दिल्या.

            जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा निवडणुकीसाठी आलेल्या निरीक्षकांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र, जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्यासह सामान्य निवडणूक निरीक्षक श्यामलाल पुनिया, बिहान चंद्र चौधरी, पोलिस निरीक्षक बत्तुला गंगाधर, खर्च निरीक्षक वेंकन्ना तेजावत, डॉ. उमा माहेश्वरी आदी उपस्थित होते.

निवडणूक निरीक्षक यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांना विविध सूचना दिल्या. उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आल्याने आजपासून प्रचार सुरू होणार आहे. प्रचारासाठी लागणाऱ्या सर्व परवानगी एक खिडकीच्या माध्यमातून देण्यात येत आहे. तातडीने सर्व परवानगी मिळण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे. उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी फिरते आणि स्थिर पथक निर्माण करण्यात आले आहे. ही पथक कार्यरत असल्याची खात्री करण्यात यावी. त्यांच्यामार्फत जप्तीच्या कारवाई करण्यात याव्यात. तसेच याठिकाणीचे कॅमेरे आणि वीज पुरवठा सुरळीत सुरू राहतील, याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना दिल्या.

उमेदवारांनी त्यांचा प्रचार करताना आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. उमेदवारांनी वैयक्तिक टिका-टिप्पणी टाळावी. तक्रार करण्याआधी सत्यता पडताळून पाहावी. याबाबत राजकीय पक्षांनी निवडणूक प्रतिनिधींनाही सूचना द्याव्यात. जिल्ह्यात कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार याची दक्षता सर्वांनी घ्यावी. नागरिकांच्या तक्रारी किंवा समस्या आल्यास त्याबाबत तातडीने कार्यवाही करून त्या निराकरणासाठी प्रयत्न करावेत. उमेदवारांच्या खर्चाबाबत योग्य कार्यवाही करण्यात यावी. खर्च पथकांनी दर्शविलेला खर्च आणि उमेदवारांचा खर्च यांची जुळवणी होणे आवश्यक आहे.

निवडणूका पारदर्शक आणि न्याय वातावरणात होण्यासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया पार पाडावी. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. उमेदवारांच्या मतदान प्रतिनिधींना तातडीने ओळखपत्र देण्यात यावे. त्यांना मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेची संपूर्ण माहिती देण्यात यावी. तसेच उमेदवारांनी काय करावे आणि काय करू नये याबाबतची माहिती देण्याच्या सूचनाही निरीक्षकांनी यावेळी दिल्या.

000000

अमरावतीत स्थिर सर्वेक्षण पथक गठीत

अमरावती, दि. 5 (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने 38- अमरावती विधानसभा मतदार संघात असोरिया पेट्रोलपंपजवळ, चांगापुर चौक तसेच अर्जुन नगर चौक आणि एसआरपीएफ कॅम्प या ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथकांची स्थापना केलेली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन होईल अशा वस्तू, बेकायदेशीर रोख किंवा अन्य साहित्य यांचे आवागमन होऊ नये, यादृष्टीने सदर पथकातील अधिकारी, कर्मचारी , येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर बारीक लक्ष ठेवत असून प्रत्येक वाहनांची बारकाईने तपासणी करत आहेत. परंतु वाहन तपासणी दरम्यान काही नागरिक हुज्जत घालत असून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे या पथकात कार्यरत अधिकारी, कर्मचारी हे निवडणूकीविषयक राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत असून कुणीही त्यांच्याशी हुज्जत घालू नये, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी 38-अमरावती विधानसभा मतदारसंघ यांनी केले आहे.

0000

धामणगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना चिन्ह वाटप

अमरावती, दि. 5 (जिमाका ) :धामणगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढविण्यासाठी प्राप्त झालेल्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी तेजस्वी कोरे यांनी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले सर्वसाधारण केंद्रीय निवडणूक निरीक्षक  बि. के. वसवा यांच्या उपस्थितीत 24 उमेदवारांना चिन्ह वाटप केले .

उमेदवारांना चिन्ह वाटप पुढीलप्रमाणे :

अडसड प्रताप अरुणभाऊ  (भारतीय जनता पार्टी - कमळ ), जगताप वीरेंद्र वाल्मिकराव (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - हात ) , यागेंद्र एकनाथ पाटील (बहुजन समाज पार्टी -हत्ती ) ,अनिल भाऊराव कांबळे (नकी भारतीय एकता पार्टी ), अक्षय कुमार (आंबेडकर रिपब्लिक पार्टी स्पॅनर ),

गौरव किरण राहाटे (रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (ए) शिवण यंत्र ), दीपक पुंडलिक आकोडे (जय हिंद जय भारत राष्ट्रीय पार्टी -रबर स्टॅम्प ), नीलम देवीरावजी रंगारकर (देश जनहित पार्टी -शाळेचे दप्तर ), डॉ. निलेश ताराचंद विश्वकर्मा (वंचित बहुजन आघाडी -गॅस सिलेंडर, प्रवीण निळकंठ हेंडवे (प्रहार जनशक्ती पार्टी -बॅट ), फिरोज खाँ पठान (ऑल इंडिया मजलिस - ए - इन्कलाब - ए -मिल्लत -जहाज ), विकी दयाराम मुंडे (जन जनवादी पार्टी -शिट्टी, विजय रमेशराव खोब्रागडे (राष्ट्रीय गोंडवाना पार्टी - करवत ), सुनिता विजय रायबोले (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया -डेमोक्रॅटीक -फळांची टोपली ), हर्षवर्धन बळीराम खोब्रागडे (बहुजन महा पार्टी -सफरचंद ), अभिलाषा चंद्रशेखर गजभिये (अपक्ष -प्रेशर कुकर ), अमोल प्रभाकर बिरे (अपक्ष -ऊस शेतकरी ), गजानन ज्ञानेश्वर चांदूरकर (अपक्ष -कात्री ), भोळे अनिल उद्धवराव (अपक्ष - कोट ), राजेश बाबाराव भोयर(अपक्ष -संगणक ),  रामटेके विजय शंकर (अपक्ष - हिरा ), विजय शामराव शेंडे (अपक्ष - स्टुल), संदीप कृष्णराव वाठ (अपक्ष -ऑटो रिक्शा ), स्वप्निल जयकुमार खडसे (अपक्ष -इस्त्री ).

 

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...