Monday, November 4, 2024

DIO NEWS AMRAVATI 04.11.2024

 

धामणगाव रेल्वे, बडनेरा मतदारसंघाच्या निवडणूक निरीक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन

अमरावती, दि. 04 (जिमाका) : 36-धामणगाव रेल्वे आणि 37 बडनेरा  विधानसभा निवडणुकीसाठी बी. के. वासवा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीशी संबंधित तक्रारींसाठी त्यांच्याशी संपर्क करता येणार आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 36 - धामणगाव रेल्वे आणि 37 - बडनेरा विधानसभा मतदारसंघासाठी बी. के. वासवा यांची सामान्य निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9021788055 असा आहे. निवडणूक निरीक्षक यांना भेटण्याची वेळ सकाळी 10 ते 11 असून त्यांना सापन कक्ष, शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे भेटाता येणार आहे.

00000

मोर्शी विधानसभा मतदारसंघासाठी बिहान चंद्र चौधरी निवडणूक निरीक्षक

अमरावती, दि. 04 (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024ची घोषणा भारत निवडणूक आयोगामार्फत करण्यात आली आहे. 43 - मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक म्हणून बिहान चंद्र चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

43 - मोर्शी विधानसभा मतदारसंघातील शहरी व ग्रामीण मिळून एकूण 311 मतदानकेंद्रांवर दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे.

निवडणूक निरीक्षक दि. 10 आणि 11 नोव्हेंबर 2024 रोजी गृहमतदानाच्या कामाचे निरीक्षण करतील. दि. 12 आणि 13 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान पथकांचे प्रशिक्षणावेळी, तसेच दि. 14 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान यंत्रे निवडणूकीसाठी तयार करतेवेळी आणि दि. 19 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान पथके मतदान केंद्रांवर रवाना करतेवेळी मोर्शी येथे उपस्थित राहतील. दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी ते मतदारसंघातील मतदान केंद्रांची पाहणी करणार आहेत. दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणीदरम्यान उपस्थित राहून मतमोजणीचे निरीक्षण करणार आहेत.

निवडणूक निरीक्षक हे मतदार संघातील नागरिकांच्या निवडणूकविषयक तक्रारी अथवा सूचना स्विकारण्यासाठी शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे सकाळी 10 ते 11 वाजता या वेळेत उपलब्ध राहणार आहेत. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9021796356 असा आहे. नागरीक निवडणूकविषयक तक्रारी किंवा सूचना त्यांच्या bidhaias@gmail.com या ई-मेल आयडी वरसुद्धा पाठवू शकतील, असे मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रदीपकुमार पवार यांनी कळविले आहे.

00000

धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघातील उमेदवाराच्या खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर

अमरावती, दि. 4 (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने खर्च निरीक्षक यांच्याशी चर्चा करून प्रत्येक उमेदवाराची खर्च नोंदवही तपासणीसाठी  वेळापत्रक तयार करण्यात येत आहे. यासाठी धामणगाव रेल्वे  विधानसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन

 धामणगाव रेल्वे  उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी  तेजश्री कोरे  यांनी केले आहे.

            पहिली तपासणी दि. 8 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी  10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत, दुसरी तपासणी दि. 12 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत, तिसरी तपासणी दि. 16 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत राहील. तपासणीचे ठिकाण उपविभागीय कार्यालय, सभागृह  येथे राहील.

            जर उपरोक्त दिनांकाला सर्व उमेदवारांच्या लेख्यांची तपासणी वेळेअभावी पूर्ण होऊ शकली नाही, तर उर्वरित उमेदवारांच्या लेख्याची तपासणी त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येईल.

            धामणगाव रेल्वे विधासभा मतदारसंघ, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मधील सर्व उमेदवारांनी आपले खर्चाचे लेखे आवश्यक त्या सर्व अभिलेख्यासह तपासणीसाठी स्वत: किंवा प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत उपलब्ध करून द्यावे. तपासणी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अनिवार्य असल्याने कोणत्याही उमेदवाराने किंवा प्राधिकृत प्रतिनिधीने अनुपस्थित राहू नये, अन्यथा नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.

00000

निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे

-निवडणूक निरीक्षक श्यामलाल पुनिया

अमरावती, दि.4(जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांना चिन्ह वाटप झाल्यानंतर आता प्रचार सुरू होणार आहे. उमेदवारांनी निवडणूक कालावधीत प्रचार करताना आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन अमरावती विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक श्यामलाल पुनिया यांनी केले.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांची बैठक नवीन तहसिल कार्यालयात घेण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

श्री. पुनिया यांनी, निवडणूक लढवित असलेल्या उमेदवारांना मार्गदर्शन केले. चिन्ह वाटप करण्यात आल्यानंतर उमेदवारांना प्रचार करावा लागणार आहे. मात्र प्रचार करताना सर्व परवानगी घेऊन करावा. यासाठी मार्गदर्शक पुस्तिकाही देण्यात येणार आहे. उमेदवार अंतिम झाल्यानंतर प्रत्यक्ष मतपत्रिका कशी राहणार आहे, याचाही नमुना देण्यात येणार आहे. निवडणूक पारदर्शी पद्धतीने होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. निवडणुकीमध्ये प्रतिनिधी नेमताना त्यांना योग्य माहिती देण्यात यावी. त्यामुळे चुकीची माहितीवर प्रतिबंध घातल्या जाईल.

निवडणुकीत 50 टक्के मतदान केंद्रांचे लाईव्ह टेलिकास्ट करण्यात येणार आहे. तसेच गृहमतदानाच्या प्रक्रियेमध्ये सर्व उमेदवारांनी उपस्थिती दर्शवावी. अमरावतीच्या निवडणुकीत 22 उमेदवार असल्याने दोन मतदान यंत्र राहणार आहे. मतदान प्रक्रियेबाबत उमेदवारांना वेळोवेळी सर्व माहिती उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. उमेदवारांना निवडणुकीसाठ 40 लाख रूपयांची मर्यादा असून या मर्यादेत खर्च करावा लागणार आहे. निवडणूकीत होणारा खर्च पथकास सादर करावा. तसेच मतदारांना कोणतेही प्रलोभने देण्यात येऊ नये. मतदारांनी मतदानासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी उमेदवारांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

यावेळी उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या शंकाचे निरासन करण्यात आले. तसेच खर्च विषयक बाबींची माहिती देण्यासाठी व्यक्तिश: मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले.

000000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...