Wednesday, June 10, 2026

DIO NEWS AMRAVATI 10.06.2026

 शुक्रवारी जागतिक बाल कामगार प्रथाविरोधी दिन

अमरावती, दि. 10 (जिमाका) : बालमजुरी या अनिष्ठ प्रथेविरूद्ध विस्तृत प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे. ही समस्या ती सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक समस्यांशी निगडीत असल्यामुळे नागरिकांमध्ये सजगता आणण्यासाठी 12 जुन रोजी जागतिक बालकामगार प्रथा विरोधी दिवस साजरा करण्यात येतो.

जिल्ह्यात सन 2021 ते सन 2026 पर्यंत 58 धाडसत्राचे करण्यात आले. यात 181 आस्थापनांना भेटी देऊन 25 बालक, बालकामगार मुक्त केले आहेत. यामध्ये 14 वर्षाचे आतील 10 बालकामगार आहे. तसेच 14 वर्षावरील 15 बालक आहे. बालकामगार कामावर ठेवलेल्या 8 मालकावर बालकामगार अधिनियम, 1986 अंतर्गत न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. मुक्त केलेल्या बालकामगारांच्या शैक्षणिक पुनर्वसनाकरीता शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद व महापालिका यांच्‍यामार्फत 14 वर्षाखालील बालकामगाराचे पुनर्वसन करण्यात येते. बालकामगार या अनिष्ठ प्रथेतून राज्य मुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली नेमलेल्या कृतीदलाची बैठक घेण्यात येते.

तसेच केंद्र शासनाच्या बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 1986 नुसार 14 वर्षाखालील बालकांना कोणत्याही व्यवसाय, प्रक्रियेत कामावर ठेवणे, तसेच 14 वर्ष पुर्ण परंतू 18 वर्ष पूर्ण न झालेल्या किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योग व प्रक्रियेमध्ये कामावर ठेवणे गुन्हा आहे. जर मालकाने, नियोक्त्याने बाल अथवा किशोरवयीन मुलांना कामावर ठेवल्यास 6 महिने ते 2 वर्षापर्यंत कारावास किंवा 20 हजार ते 50 हजार  रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा होऊ शकते.

भारतीय राज्यघटनेनुसार शिक्षण आणि आरोग्य बालकांचे मुलभूत अधिकारी आहेत. बालकाचे हे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी बालमजुरी प्रथा कायमस्वरुपी नष्ट होणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे मान्य केले असून 14 वर्षाखालील मुलांना बालमजुरी करण्यास प्रवृत्त करणाऱ्याविरुद्ध जबर शिक्षेची तरतूद केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापनाधारक, उद्योजकांनी बाल व किशोरवयीन कामगारांना कामावर ठेवू नये, असे आवाहन कामगार विभागाने केले आहे.

00000000

सन २०१४ मध्ये २१,८०१ किमी असलेले रेल्वे विद्युतीकरण हे सन २०२६ मध्ये ६९,८७३+ किमीपर्यंत पोहोचले आहे.


सन २०१४ मध्ये २१,८०१ किमी असलेले रेल्वे विद्युतीकरण हे सन २०२६ मध्ये ६९,८७३+ किमीपर्यंत पोहोचले आहे. या अभूतपूर्व प्रगतीमुळे देशातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत झाला असून, कार्बन उत्सर्जनात घट, कार्यक्षमतेत वाढ आणि शाश्वत विकासाला चालना मिळत आहे. वेगवान, हरित आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. From 21,801 km of electrified railway tracks in 2014 to 69,873+ km in 2026, India’s rail network has witnessed a remarkable transformation. This rapid expansion is enhancing connectivity, reducing carbon emissions, improving operational efficiency. #LongestServingElectedPMModi
 

दरडोई उत्पन्नात २०१४ मधील ₹८६,६४७ वरून २०२६ मध्ये ₹२,४३,१८० पर्यंतचा प्रवास हा आर्थिक समावेशन, सर्वसमावेशक विकास आणि नागरिकांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा पुरावा आहे. . .


 दरडोई उत्पन्नात २०१४ मधील ₹८६,६४७ वरून २०२६ मध्ये ₹२,४३,१८० पर्यंतचा प्रवास हा आर्थिक समावेशन, सर्वसमावेशक विकास आणि नागरिकांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा पुरावा आहे.

. . From ₹86,647 in 2014 to ₹2,43,180 in 2026, India's journey reflects a strong commitment to financial inclusion, economic growth, and improved opportunities for every citizen. #LongestServingElectedPMModi

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे भारताच्या स्वच्छ ऊर्जा प्रवासाला अभूतपूर्व गती मिळाली आहे.



प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे भारताच्या स्वच्छ ऊर्जा प्रवासाला अभूतपूर्व गती मिळाली आहे. या काळात देशाने स्वच्छ, शाश्वत आणि हरित ऊर्जेच्या दिशेने उल्लेखनीय प्रगती साधली आहे. . . In 4,399 days, PM Modi's vision accelerated India's clean energy journey. #LongestServingElectedPMModi

 

एक्सप्रेसवेच्या २०१४ मधील १,००० किमी जाळ्यापासून ते २०२६ मध्ये ७,३३२+ किमी पर्यंतचा प्रवास हा भारताच्या पायाभूत विकासाचा वेग दर्शवतो.


 

एक्सप्रेसवेच्या २०१४ मधील १,००० किमी जाळ्यापासून ते २०२६ मध्ये ७,३३२+ किमी पर्यंतचा प्रवास हा भारताच्या पायाभूत विकासाचा वेग दर्शवतो. वाढती कनेक्टिव्हिटी, कमी होणारा प्रवासाचा कालावधी, आर्थिक प्रगती आणि सर्वसमावेशक विकास यांना या एक्सप्रेसवे क्रांतीने नवी गती दिली आहे. . . From just 1,000 km of expressways in 2014 to 7,332+ km in 2026, India's road infrastructure has witnessed unprecedented growth. Connecting regions, boosting economic activity, reducing travel time, and bringing opportunities closer to every citizen — the expressway revolution is transforming the nation. #LongestServingElectedPMModi

२०१४ मध्ये मोजक्याच स्टार्टअप्सपासून सुरू झालेला प्रवास आज १.४ लाखांहून अधिक नोंदणीकृत स्टार्टअप्सपर्यंत पोहोचला आहे.


२०१४ मध्ये मोजक्याच स्टार्टअप्सपासून सुरू झालेला प्रवास आज १.४ लाखांहून अधिक नोंदणीकृत स्टार्टअप्सपर्यंत पोहोचला आहे. नव्या पिढीतील नवोन्मेषकांच्या बळावर भारत आज जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था म्हणून उदयास आला आहे. . . From a handful of startups in 2014 to more than 1.4 lakh registered startups today, India has emerged as the world's third-largest startup ecosystem, powered by a new generation of innovators. . . भारत की स्टार्टअप क्रांति देश की युवा पीढ़ी के बढ़ते आत्मविश्वास की कहानी है। 1.4 लाख से ज्यादा रजिस्टर्ड स्टार्टअप्स के साथ भारत आज दुनिया का तीसरा सबसे बड़ा स्टार्टअप इकोसिस्टम है, जहाँ हमारे युवा देश को आगे बढ़ा रहे हैं। #LongestServingElectedPMModi

 

सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या ४०१ दिवसांत 'डिजिटल इंडिया' अभियानाची सुरुवात करण्यात आली.

सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या ४०१ दिवसांत 'डिजिटल इंडिया' अभियानाची सुरुवात करण्यात आली. आज १०२ कोटींहून अधिक इंटरनेट जोडण्या, डिजिटल पेमेंट्स आणि तंत्रज्ञानाधारित प्रशासनामुळे भारताची काम करण्याची, शिकण्याची आणि व्यवहार करण्याची पद्धत आमूलाग्र बदलली आहे. . . 401 days after taking office, Digital India was launched. Today, over 102 crore internet connections, digital payments and technology-led governance have transformed how India works, learns and transacts. . . 401 दिन! 'डिजिटल इंडिया' को जमीन पर उतारने में बस इतना ही समय लगा। आज इसी डिजिटल क्रांति के दम पर पेमेंट्स से लेकर सरकारी सेवाओं की डिलीवरी तक, यह टेक्नोलॉजी करोड़ों भारतीयों को सशक्त बना रही है। #LongestServingElectedPMModi
 

काही सुधारणा व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणतात व त्या पिढ्यानपिढ्या उपयुक्त ठरतात.


 

काही सुधारणा व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणतात व त्या पिढ्यानपिढ्या उपयुक्त ठरतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात लागू करण्यात आलेल्या #जीएसटी मुळे विविध करांच्या गुंतागुंतीच्या जाळ्याऐवजी एकसंध राष्ट्रीय बाजारपेठ निर्माण झाली. त्यामुळे भारतभर व्यवसाय करणे अधिक सुलभ झाले.

. . Some reforms change systems for generations. #GST, introduced within PM Modi's first term, replaced a maze of taxes with one national market, making it easier to do business across India. . . टैक्स के उलझे जाल को खत्म कर 'एक राष्ट्र, एक बाजार' का सपना सच करने वाला GST, आजाद भारत के सबसे बड़े आर्थिक सुधारों में से एक रहा। पिछले 4,399 दिनों के सफर में यह देश की तरक्की का बड़ा मील का पत्थर है। #LongestServingElectedPMModi

सक्षम भारताची उभारणी भक्कम पायाभूत सुविधांवर होते.


 सक्षम भारताची उभारणी भक्कम पायाभूत सुविधांवर होते. २०१४ मध्ये ७४ विमानतळांपासून २०२६ मध्ये १६४ विमानतळांपर्यंतचा प्रवास करत, हवाई संपर्क केवळ मोठ्या शहरांपुरता मर्यादित न राहता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. यामुळे देशभरातील विकासाला नवी गती मिळाली आहे.

. . A stronger India is built on stronger infrastructure. From 74 airports in 2014 to 164 in 2026, connectivity has expanded far beyond major cities, unlocking growth across the country. . . आधुनिक भारत की बदलती तस्वीर यहाँ की कनेक्टिविटी में साफ दिखती है। साल 2014 में देश में सिर्फ 74 चालू हवाई अड्डे थे, जिनकी संख्या आज बढ़कर 164 हो चुकी है। इसने नए अवसरों को हर क्षेत्र के करीब ला दिया है। #LongestServingElectedPMModi

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारतातील सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले प्रधानमंत्री बनले आहेत



प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारतातील सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले प्रधानमंत्री बनले आहेत; हा टप्पा त्यांच्या एका दशकाहून अधिक काळातील नेतृत्व, सेवा आणि राष्ट्रनिर्मितीच्या कार्याचे प्रतिबिंब आहे.
त्यांच्या नेतृत्वात भारतासह महाराष्ट्र राज्याने विविध क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल अनुभवले आहेत. आर्थिक विकास आणि डिजिटल परिवर्तनापासून ते पायाभूत सुविधांचा विस्तार, सामाजिक सक्षमीकरण आणि जागतिक स्तरावर अधिक बळकट स्थान निर्माण करण्यापर्यंतचा हा प्रवास विकास आणि लोककल्याणावर सातत्याने दिलेला भर, यामुळे साकार झाला आहे.
.
.
Prime Minister Narendra Modi has become India's longest-serving elected Prime Minister, a milestone that reflects over a decade of leadership, service and nation-building.
Over the past 4,399 days, India and Maharashtra has witnessed transformation across sectors. From economic growth and digital transformation to infrastructure expansion, social empowerment and a stronger global presence, this journey has been shaped by a sustained focus on development and citizen welfare.


 

Tuesday, June 9, 2026

DIO NEWS AMRAVATI 09.06.2026

                                                     अनुसुचित जाती, जमातीच्या शेतकऱ्यांनी

‘प्रति थेंब अधिक पीक’ योजनेचा लाभ घ्यावा

*कृषी विभागाचे आवाहन

अमरावती, दि. 9 (जिमाका): राष्ट्रीय कृषि विकास योजना ‘प्रति थेंब अधिक पीक’ अंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचा समावेश करण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचन संचाच्या खरेदीसाठी विविध योजनांच्या समन्वयातून तब्बल 90 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जात आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना विविध टप्प्यात पूरक अनुदान देऊन आर्थिक दिलासा दिला जात आहे. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेतून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के, तर इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान दिले जाते. मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेच्या माध्यमातून अल्प व अत्यल्प भूधारक लाभार्थ्यांना 25 टक्के, तर इतर लाभार्थ्यांना 30 टक्के पूरक अनुदान मिळते. तसेच जिल्हा परिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन मिशन योजना आणि बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेमधून अल्प व अत्यल्प भूधारकांना 10 टक्के, तर इतर लाभार्थ्यांना 15 टक्के पूरक अनुदान दिले जाते.

इच्छुक शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकी हक्काचा सातबारा आणि आठ अ उतारा असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याकडे शेतीसाठी ओलिताची सोय असणे बंधनकारक आहे. या सिंचन योजनेचा लाभासाठी पात्र व इच्छुक लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

जिल्ह्यातील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊन आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

0000000

जिल्ह्यातील 498 ग्रामपंचायतींच्या सदस्य आरक्षणाची सोडत जाहीर

अमरावती, दि. 9 (जिमाका) : राज्यातील बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील सन 2024 आणि 2025 मध्ये मुदत संपलेल्या, तसेच सन 2026 च्या कालावधीत मुदत संपणाऱ्या नवनिर्मित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील 498 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्यांच्या आरक्षण निश्चितीचा आणि आरक्षण फिरवण्याचा कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम 10 ते 12 जून 2026 या तीन दिवसांच्या कालावधीत राबविला जाणार आहे. नागरिकांनी आरक्षण सोडतीला उपस्थित राहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांनी केले आहे.

0000000

शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

अमरावती, दि. 09 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

सदर प्रतिबंधात्मक आदेश पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला आहे. हा आदेश दि. 11 जून ते 25 जुन 2026च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी कळविले आहे.

000000

निंभोरा येथील शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू

अमरावती, दि. 9 (जिमाका) : जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या निंभोरा येथे कार्यरत शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे.

यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह (युनिट क्र. 1, 2, 3), निंभोरा, अमरावती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (जुने नाव गुणवंत) शासकीय वसतिगृह, निंभोरा, अमरावती, संत गाडगे महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह, निंभोरा, अमरावती या वसतिगृहांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनातर्फे सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा मोफत पुरविल्या जाणार आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम hmas.mahait.org या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर, त्या अर्जाची प्रिंट डाऊनलोड करावी. डाऊनलोड केलेली प्रिंट घेऊन संबंधित वसतिगृहामध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. कनिष्ठ महाविद्यालय आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख: 15 जुलै असून प्रवेशाची पहिली यादी 31 जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध केले जाणार आहे.

अधिक माहिती किंवा संपर्कासाठी विद्यार्थ्यांनी 9130948264 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच विद्यार्थ्यांनी मुदतीत आपले अर्ज संबंधित वसतिगृहाकडे सादर करावेत, असे आवाहन गृहप्रमुख आणि गृहपाल यांनी केले आहे.

000000

वसतिगृह इमारतीसाठी प्रस्ताव आमंत्रित

*15 दिवसांत अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 9 (जिमाका) : इतर मागास बहुजन कल्याण विभागाद्वारे विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील 100 विद्यार्थ्यांसाठी अमरावती येथे मुलांचे वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. या वसतिगृहासाठी सर्व सोयी-सुविधांनी युक्त अशी इमारत भाडेतत्त्वावर घ्यावयाची आहे. यासाठी 15 दिवसांच्या आत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

शासन निर्णयानुसार अंदाजे 9 हजार 200 चौरस फूट बांधकाम असलेली इमारत भाड्याने हवी आहे. शहरातील स्थानिक इच्छुक इमारत मालकांनी यासाठी आपले अर्ज सादर करावे लागणार आहे. इच्छुक इमारत मालकांनी आपले अर्ज विहित नमुन्यात सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, अमरावती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलिस आयुक्तालयाच्या मागे, चांदूर रेल्वे रोड, अमरावती येथे सादर करावेत.

अर्जाचा नमुना आणि यासंबंधीचा इतर संपूर्ण तपशील माहितीसाठी कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयाचा ई-मेल आयडी adobbwoamravati@gmail.com येथे संपर्क साधता येईल. शहरातील इच्छुक इमारत मालकांनी मुदतीच्या आत अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक यांनी केले आहे.

00000

शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी अर्ज सुरु

अमरावती, दि. 09 (जिमाका): धामणगाव रेल्वे येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृहात शैक्षणिक सत्र 2026-27 साठी मोफत प्रवेश प्रक्रियेस सुरवात झाली आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग तसेच इतर पात्र प्रवर्गातील आठवीपासून उच्च व व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करू शकतील. विद्यार्थ्यांना निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, जिम आणि वाय-फाय सुविधा विनामुल्य उपलब्ध होणार आहेत.

विद्यार्थ्यांना गुणवत्ता आणि रिक्त जागांनुसार वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना अर्जाची अंतिम मुदत 30 जून असून अकरावी व बिगर व्यावसायिक (महाविद्यालयीन) अभ्यासक्रमासाठी 15 जुलैपर्यंत अर्ज करता येतील. अर्जासाठी hmas.mahait.org संकेतस्थळाला भेट द्यावी, तसेच अधिक माहितीसाठी वसतिगृहातील गृहपाल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000000

Monday, June 8, 2026

DIO NEWS AMRAVATI 08.06.2026



                                                     पहिल्या टप्यातील जनगणना कामात

तिवसा नगरपंचायत, दर्यापूर तहसिल अव्वल

*100 टक्के घरयादी, गटयादीचे कार्य पूर्ण

*जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार

अमरावती, दि. 8 (जिमाका): जिल्ह्यात जनगणनेच्या कामकाजाला सुरवात करण्यात आली आहे. यातील पहिल्या टप्प्यात तिवसा नगरपंचायती आणि दर्यापूर तहसिलने प्रथम ग्रामीण चार्ज कार्यालयाने मुदतीआधीच पहिल्या टप्प्यातील कार्य 100 टक्के पूर्ण केले आहे. यानिमित्ताने जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते तिवसा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शिवदास मुसळे आणि दर्यापूरचे तहसिलदार रविंद्र कानडजे यांचा आज प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

जनगणना 2027 मधील पहिला टप्प्याचे कामकाज यशस्वीरित्या पुर्ण करणारे तिवसा नगरपंचायत हे जिल्ह्यातील प्रथम शहर चार्ज कार्यालय ठरले आहे. यानिमित्ताने तिवसा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शिवदास मुसळे, कार्यालय अधिक्षक रोहन राठोड, जनगणना लिपीक सुधीर विघ्ने, तांत्रिक सहायक निलकमल बोके यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यशस्वीरित्या कामकाज करणारे दर्यापूर तहसील हे जिल्ह्यातील प्रथम ग्रामीण चार्ज कार्यालय ठरल्याने दर्यापूर तहसीलचे तहसीलदार रविंद्र कानडजे, नायब तहसीलदार प्रमोद काळे, जनगणना लिपीक इमरान देशमुख, तांत्रिक सहायक अपेक्षा हिवराळे यांचा सत्कार करण्यात आला.

जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यात घरीयादी, गटयादी बनविण्यात येत आहे. हा टप्पा दि. 16 मे ते 14 जून या कालमर्यादेमध्ये करण्यात येत आहे. मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, जनगणना संचालनालयाच्या निर्देशानुसार कालमर्यादेप्रमाणे दि. 10 जूनपर्यंत कार्यक्षेत्रातील सर्व एचएलबीचे काम 100 टक्के पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र तिवसा नगरपंचायतीने दि. 4 जून 2026 रोजीच त्यांच्या शहर चार्जमधील सर्व एचएलबीचे काम पूर्ण केले आहे. या कामगिरीमुळे नगरपंचायत तिवसा हे जिल्ह्यासह अमरावती विभागातील 100 टक्के काम पूर्ण करणारे प्रथम कार्यालय ठरले आहे. तसेच ग्रामीण चार्ज कार्यालय दर्यापूर तहसील यांनी दि. 7 जून 2026 रोजी त्यांच्या चार्जमधील सर्व एचएलबीचे 100 टक्के काम पूर्ण केले आहे.

जिल्ह्यातील एकूण 14 शहर चार्ज कार्यालयापैकी 9 चार्ज कार्यालयांनी 100 टक्के काम पूर्ण केले असून उर्वरित 5 कार्यालयांचे कामकाज 85 टक्केपर्यंत पूर्ण झाले आहे. तसेच 14 ग्रामीण चार्ज कार्यालयापैकी एका चार्ज कार्यालयाचे 100 टक्के काम पूर्ण झालेले असून 11 ग्रामीण चार्ज कार्यालयाचे काम 90 टक्केपेक्षा जास्त झालेले आहे.

0000000

 मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

*ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 8 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर 125 वी जयंतीनिमित्त मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, अमरावती' येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रवेशासाठी विद्यार्थिनींना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत.

मागासवर्गीय विद्यार्थिनींनी चालू शैक्षणिक वर्षात अमरावती शहरातील महाविद्यालयांमध्ये किंवा संस्थांमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतला आहे, त्या अर्ज करण्यास पात्र आहेत. यात अकरावी, पदवी, पदविका, आयटीआय प्रवेश घेतलेल्यांना प्रवेश मिळणार आहे. वसतिगृहात प्रवेश मिळणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत निवास, राहण्याची उत्तम व्यवस्था, मोफत भोजन व्यवस्था, स्टेशनरी भत्ता, ड्रेसकोड भत्ता, शैक्षणिक सहल आणि प्रोजेक्ट्स (प्रकल्प) खर्च, या सुविधा पूर्णपणे मोफत पुरवल्या जाणार आहेत.

अर्ज करताना विद्यार्थिनींनी उत्पन्नाचा दाखला, मागील वर्षाच्या गुणपत्रकेची झेरॉक्स प्रत, जात प्रमाणपत्र, ही कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. इच्छुक आणि पात्र विद्यार्थिनींनी प्रवेशासाठी hmas.mahait.org या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन शासकीय वसतिगृहाच्या गृहप्रमुखांनी केले आहे.

00000

सुधारित बातमी

जिल्ह्यात 90 टक्के मतदार मॅपिंग पूर्ण

दर्यापूर विधानसभा मतदारसंघ सर्वात पुढे

     अमरावती, दि. 8 (जिमाका) : जिल्ह्यातील मतदारयाद्यांचे अचूक सक्षमीकरण आणि मतदार मॅपिंग मोहिमेने वेग घेतला आहे. 6 जून 2026 पर्यंत जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 89.72 टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. यात दर्यापूर विधानसभा मतदार संघ 95.69 टक्क्यांसह सर्वात पुढे आहे.

     जिल्ह्यातील एकूण 8 विधानसभा मतदारसंघांपैकी दर्यापूर मतदारसंघ 95.69 टक्के मॅपिंगसह जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ धामणगाव रेल्वे 94.88 टक्केसह दुसऱ्या स्थानावर आहे. अमरावती विधानसभा मतदारसंघही 80.06 टक्के मॅपिंगसह प्रगती करीत आहे. जिल्ह्यातील एकूण 25 लाख 58 हजार 364 मतदारांपैकी 22 लाख 95 हजार 319 मतदार मॅपिंग पूर्ण झाले आहेत. उर्वरित 2 लाख 63 हजार 45 मतदारांचे मॅपिंग झालेले नाही.

    नगरपालिका क्षेत्रात सरासरी 85.19 टक्के मॅपिंग पूर्ण झाले आहे. यात भातकुली नगरपालिका 95.57 टक्केसह सर्वात आघाडीवर आहे. जिल्ह्यातील मॅपिंगच्या प्रक्रियेत लक्षणीय वाढ झालेली आहे. 17 मार्च रोजी जिल्ह्याचे मॅपिंग 46.37 टक्के होते. यात आता जिल्हा आता 89.72 टक्केवर पोहोचला आहे. यामध्ये सर्वाधिक प्रगती अमरावती मतदारसंघात झाली असून, तिथली टक्केवारी 28.03 टक्क्यांवरून 80.06 टक्के वाढ झाली आहे.

     जिल्ह्यातील उर्वरित 2 लाख 63 हजार 45 मतदारांचे मॅपिंग आणि त्रुटी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येत आहे. मतदारांनीही मॅपिंगच्या कार्यात सहकार्य करावे, बीएलओंकडून मॅपिंगची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

0000000

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मेगा कृषि आउटरीच कॅम्‍पमध्ये 19 कोटींचे कर्जवाटप

अमरावती, दि. 8 (जिमाका) : सेंट्रल बँक ऑफ इंडियाद्वारे शनिवार, दि. 6 जून रोजी दर्यापुर येथील माहेश्वरी भवन येथे मेगा कृषि ऋण मेळावा घेण्यात आला. यात 19 कोटी रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले.

नाबार्डच्या डीडीएम रश्मिता पंचाले अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नगर विकासचे सहआयुक्त डॉ. विकास खंडारे, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे उपमहाप्रबंधक सचिन सुधाकर, क्षेत्रीय प्रमुख सुनील पाण्डेय उपस्थित होते.

श्री. पाण्डेय यांनी बँक विविध कृषि योजनामार्फत कृषि विकासासाठी कार्यरत आहे, देशातील कृषि उद्योगांना चालना देण्यासाठी सर्वात कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करुन देत असल्याचे सांगितले. तसेच बँकेच्या विविध कर्ज योजनाची माहिती विनय वैश यांनी दिली. श्रीकांत पडवल यांनी सूत्रसंचालन केले. अग्रणी जिल्हा व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी आभार मानले.

Saturday, June 6, 2026

DIO NEWS AMRAVATI 06.06.2026


 जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जागतिक क्लब फूट दिन उत्साहात साजरा

अमरावती, दि. ६ : जन्मजात पायाच्या विकाराविषयी जनजागृती निर्माण करणे, लवकर निदानाचे महत्त्व पटवून देणे आणि उपलब्ध मोफत उपचार सुविधांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे या उद्देशाने जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे डीआयईसी  विभाग व बालरोग विभागाच्या संयुक्त विद्यमाने नुकताच जागतिक क्लब फूट दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

  क्लब फूट हा जन्मजात पायाचा विकार असून यामध्ये बाळाचा एक किंवा दोन्ही पाय आत व खाली वळलेले असतात. हा विकार जन्मतःच दिसून येतो. मात्र योग्य वेळी निदान करून उपचार सुरू केल्यास बालकाला पूर्णपणे सामान्य जीवन जगणे शक्य होते.

जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे सन २०१९ पासून क्लब फूट उपचार कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन व प्युअर इंडिया संस्थेच्या संयुक्त विद्यमाने क्लब फूट बाधित बालकांना मोफत उपचार, समुपदेशन, आवश्यक साहित्य व नियमित फॉलोअप सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत ८८ क्लब फूट बाधित बालकांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून अनेक बालकांना सामान्यपणे चालणे व दैनंदिन जीवन जगणे शक्य झाले आहे.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित पालकांना क्लब फूट विकार, त्याची कारणे, लक्षणे, उपचारपद्धती आणि उपचारांचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील ज्या बालकांना हा विकार आहे, त्यांच्या पालकांनी कोणतीही भीती अथवा आर्थिक चिंता न बाळगता जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे दर मंगळवारी ऑर्थोपेडिक विभागाच्या ओपीडी क्रमांक १० मध्ये उपस्थित राहून मोफत वैद्यकीय सल्ला व उपचारांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, क्लब फूट हा पूर्णपणे उपचारयोग्य विकार असून योग्य वेळी उपचार सुरू केल्यास बालकाचे आयुष्य सामान्य होऊ शकते. त्यामुळे अशा बालकांच्या पालकांनी वेळ न दवडता जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे संपर्क साधून उपलब्ध मोफत उपचार सुविधांचा लाभ घ्यावा. शासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने या बालकांसाठी सर्वतोपरी मदत उपलब्ध करून दिली जात आहे.

कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, आउटरीच आरएमओ श्री. हेडाऊ, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सोळंके, बालरोग विभाग प्रमुख  डॉ. सोनाली शिरभाते,  डॉ. नितीन दातीर  तसेच विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय क्लब फूट बाधित बालके व त्यांच्या पालकांनी उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये क्लब फूट या विकाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासह, 'क्लब फूट म्हणजे अपंगत्व नव्हे; योग्य वेळी उपचार मिळाल्यास त्यावर प्रभावी मात करता येते' हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.

 

 मान्सूनमध्ये वीज पडण्यापासून बचाव करण्यासाठी 'दामिनी' ॲप वापरण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अमरावती, दि. ६: मान्सून काळात, ।विशेषतः जून आणि जुलै महिन्यांत वीज पडण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होते. यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जीवित, वित्त आणि पशुहानी होते. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने विकसित केलेल्या 'दामिनी' मोबाईल ॲपच्या वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आशिष येरेकर यांनी केले आहे.

या ॲपच्या माध्यमातून वीज पडण्याच्या संभाव्य घटनांची पूर्वसूचना सुमारे १५ मिनिटे आधी मिळू शकते. जीपीएस प्रणालीवर आधारित असलेले हे ॲप वापरकर्त्याच्या सद्यस्थितीनुसार परिसरातील विजेची हालचाल आणि संभाव्य धोका दर्शविते, ज्यामुळे नागरिकांना वेळेत सुरक्षित ठिकाणी जाणे शक्य होते. ग्रामपातळीवरील सर्व स्थानिक व शासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी हे ॲप डाऊनलोड करून, त्यातील अलर्टनुसार नागरिकांना पूर्वसूचना द्यावी आणि जीवितहानी टाळण्यासाठी सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केले आहे.

असे डाऊनलोड करा 'दामिनी' ॲप

हे ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन 'Damini Lightning Alert' असे शोधावे आणि अधिकृत ॲप इन्स्टॉल करावे. ॲप सुरू केल्यानंतर मोबाईलचे लोकेशन (GPS) सुरू करून आवश्यक परवानग्या द्याव्यात, तसेच वेळेवर सूचना मिळण्यासाठी नोटिफिकेशन सुविधा सुरू ठेवावी.

जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषिसेवक, आपदा मित्र व सखी, कोतवाल, आशा वर्कर्स, सरपंच आणि पोलीस पाटील यांना या ॲपचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, वीज आणि पूर या आपत्तींमध्ये 'काय करावे व काय करू नये' याबाबत विनाईल बोर्डच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

00000

Friday, June 5, 2026

DIO NEWS AMRAVATI 05.06.2026

 परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा दौरा

            अमरावती, दि. 05 (जिमाका): परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा रविवार दि. 7  जून रोजी जिल्ह्याच्या दौरा आहे.

            दौऱ्यानुसार श्री. सरनाईक रविवार, दि. 7  जून रोजी सांयकाळी 7  वाजता रूबी हॉल, द ग्रॅण्ड मेहफील हॉटेल, अमरावती येथे आगमन. व सोईनुसार अमरावती येथून अकोलाकडे प्रयाण करतील.

000000

अनुसूचित जातीच्या शासकीय निवासी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू;

मोफत शिक्षणासह मिळणार विविध सुविधा

अमरावती, दि. 5 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अमरावती जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी चालविण्यात येणाऱ्या शासकीय निवासी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27  साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इयत्ता 6 वी ते 10 वी पर्यंतच्या पात्र विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये निवासी राहून सर्व सोयी-सुविधांसह मोफत शिक्षण दिले जाणार आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी निसर्गरम्य वातावरण, भव्य व सुसज्ज शासकीय इमारत, तज्ज्ञ शिक्षकवृंद, सुसज्ज ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा, राहण्याची उत्तम व्यवस्था, मोफत शैक्षणिक साहित्य व गणवेश, खेळाचे साहित्य, नाश्ता व भोजनाची व्यवस्था तसेच अद्ययावत डिजिटल रुमद्वारे उत्कृष्ट अध्यापनाची सोय शासनातर्फे करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील मुलांसाठी नांदगांव खंडेश्वर (ता. नांदगांव खंडेश्वर), तुळजापुर (ता. चांदुर रेल्वे), सामदा (ता. दर्यापुर) व बेनोडा (ता. वरुड) येथे तर मुलींसाठी हिंगणगांव-कासारखेड (ता. धामणगांव रेल्वे), बुरडघाट (ता. अचलपुर) व पांढरी (ता. अंजनगांव सुर्जी) या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी अधिक माहितीकरिता व प्रवेश अर्जासाठी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

000000

वाहनांना 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट'

बसविण्याचीअंतिम मुदत ३० जून

            अमरावती, दि. 05 (जिमाका) :  केंद्रीय मोटार वाहन नियमान्वये महाराष्ट्र शासनाने सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एचएसआरपी) बसविण्याची तरतूद केली आहे. वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांची अचूक ओळख पटविणे आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविणे आवश्यक असून सर्वोच्च न्यायालयानेही तसे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांसह शासकीय, निमशासकीय कार्यालये व बँकांनी त्यांच्या 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे बंधनकारक आहे. यापूर्वी यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती, परंतु आता ही मुदत वाढवून 30 जून 2026 पर्यंत करण्यात आली आहे.

विहित मुदतीनंतर एचएसआरपी नंबरप्लेट नसलेली वाहने किंवा बनावट एचएसआरपी असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, तसेच अशा वाहनांचे परिवहन कार्यालयातील कामकाज थांबविण्यात येईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी दिला असून सर्व वाहनधारकांनी ३० जूनपूर्वी ही नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन केले आहे.

 

00000

सावित्रीबाई फुले मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू;

31 जुलैपर्यंत मुदत

अमरावती, दि. 05 (जिमाका) :  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह युनिट क्रमांक -4 (जेल रोड, अमरावती) आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत मुलींचे शासकीय वसतिगृह (नवीन)  जेल रोड, अमरावती या दोन्ही वसतिगृह योजनांचा शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये लाभ घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या वसतिगृहांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी इयत्ता 11 वी, 12 वी तसेच सर्व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पात्र विद्यार्थिनींनी 15 ते 31 जुलै 2026 या कालावधीत https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. संदर्भीय शासन निर्णयानुसार, ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून, पात्र व इच्छुक विद्यार्थिनींनी दिलेल्या मुदतीत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

अमरावती जिल्ह्यातील शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू;

 30 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन

अमरावती, दि. 05 (जिमाका): जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासवर्ग आणि आर्थिक मागास प्रवर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय वसतिगृहांमध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरिता मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इयत्ता 8 वी ते 10 वी शालेय स्तर, तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना या वसतिगृहांमध्ये मोफत निवास, भोजन व इतर सर्व सोयी-सुविधा पुरविल्या जातात. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी सर्वप्रथम https://hmas.mahait.org या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक असून, त्यानंतर त्या अर्जाची प्रिंट काढून ती संबंधित वसतिगृहात ऑफलाईन पद्धतीने जमा करणे आवश्यक आहे.

अमरावती शहरातील निंभोरा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह (युनिट क्र. 1, 2, 3) व संत गाडगे महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह, तसेच मुलींसाठी कॅम्प परिसरातील व जेल रोडवरील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहाच्या विविध युनिट्समध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. यासोबतच जिल्ह्यातील तालुका स्तरावरील मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्येही अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. वेळापत्रकानुसार, इयत्ता 8 वी ते 10 वीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 असून, त्यांची पहिली प्रवेश यादी 7 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध केली जाईल.  कनिष्ठ महाविद्यालय व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना 15 जुलै 2026 पर्यंत अर्ज सादर करता येतील, तर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी वेळेत आपले अर्ज संबंधित वसतिगृहाकडे सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले असून, अधिक माहितीसाठी 0721-2661261 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे कळविण्यात आले आहे.

DIO NEWS AMRAVATI 10.06.2026

  शुक्रवारी जागतिक बाल कामगार प्रथाविरोधी दिन अमरावती, दि. 10 (जिमाका) : बालमजुरी या अनिष्ठ प्रथेविरूद्ध विस्तृत प्रमाणात जनजागृती करणे आवश्...