Posts

Showing posts from May, 2024

अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना

  अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना                  अमरावती, दि. 17 (जिमाका):   भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त केंद्र शासनाने स्टॅन्ड अप इंडिया ही योजना जाहीर केली आहे. या योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आली आहे.                  सन 2021-22 मध्ये 5 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असून सन 2024-25 साठी किमान 10 प्रस्ताव मंजूरीचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे. या योजनेत नवउद्योजकांची मार्जिन मनी भरण्याची क्षमता नसल्यामुळे या उद्योजक लाभार्थ्यांना एकूण उद्योग प्रकल्पाच्या 25 टक्के स्वहिस्स्यातील जास्तीत जास्त 15 टक्के मार्जिन मनी शासनातर्फे उपलब्ध करुन देण्यात येईल. या योजनेत राज्यातील अनुसूचित जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउद्योजकांना 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित 15 टक्के रक्कम शासनामार्फत देण्यात येते. योजनेचा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेत

सहकार विभागांतर्गत जी.डी.सी. अँड ए व सी.एच.एम. परीक्षा

  सहकार विभागांतर्गत जी.डी.सी. अँड ए व सी.एच.एम. परीक्षा               अमरावती, दि. 17 (जिमाका):   सहकार विभागाद्वारे 24 ते 26 मे 2024 या कालावधीत   सहकार विभागांतर्गत जी.डी.सी अँड ए व सी.एच.एम. परिक्षा गणेशदास राठी विद्यालय, पंचवटी चौक, मोर्शी रोड, अमरावती या केंद्रावर घेण्यात येणार आहे. परिक्षेला बसलेल्या परिक्षार्थ्यांना त्यांचे प्रवेशपत्रे पोष्टाव्दारे पाठविण्यात आलेली आहे. ज्या परिक्षार्थींचे नाव पात्र यादीमध्ये आहेत परंतु प्रवेशपत्र वेळेवर प्राप्त झालेले नाही अशा परिक्षार्थ्यांनी पॅनकार्ड, मतदान कार्ड, ड्राईविंग लायसन्स, आधार कार्ड, पासपोर्ट ओळखपत्र दाखवून परिक्षेस बसता येईल. अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहाकारी संस्था, अमरावती सहकार संकुल, कांता नगर अमरावती येथे किंवा दुरध्वनी क्र. 0721-2661633 व मोबाईल क्र. 9370103913 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अे. एस. उल्हे यांनी केले आहे. 000000

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कृषी विभागाशी निगडित विविध बाबींचा आढावा पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई त्वरित अदा करावी -जिल्हाधिकारी सौरभ कटियार

Image
    जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कृषी विभागाशी निगडित विविध बाबींचा आढावा   पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई त्वरित अदा करावी -जिल्हाधिकारी सौरभ कटियार         अमरावती, दि. 17 (जिमाका): प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2023-24 अंतर्गत रिलायन्स जनरल इंन्शुरन्स कंपनीने खरीप -2023 अंतर्गत नाकारण्यात आलेल्या पूर्व सूचनांची टक्केवारी जास्त असल्याने या सूचना पुन्हा तपासून शेतकऱ्यांची यादी कृषी विभागास सादर करावी. तसेच तालुका धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर येथील शेतकऱ्यांच्या स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या पूर्व सूचनांची पुन्हा तपासणी करून 15 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा करण्यात यावी. अन्यथा पीक विमा कंपनीवर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभाग येथे आज पीक विमा योजना तसेच कृषी विभागाच्या संबंधित विषयांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.   बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपूते, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित   विभागीय व्यवस्थापक सत्यजित ठोसरे, कृषी विका

अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

Image
अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन                 अमरावती, दि. 17 (जिमाका): पोलिस ठाणे सिटी कोतवाली अमरावती (शहर) अंतर्गत एका अनोळखी इसमाचा मृतदेह रेल्वे स्टेशन उड्डानपुलावरील फुटपाथ येथे सापडला. मृतकाचे अंदाजे वय 50 ते 55 वर्षे असून मृतकाचा बांधा मध्यम, रंग सावळा, उंची 5 फुट 4 इंच, डोक्याचे केस काळे पांढरे, दाढी मिशी बारिक, काळी पांढरी, चेहरा गोल, डाव्या हातावर नरेश माधुरी नाव गोंदलेले होते. अंगामध्ये लांब बाह्याचा पांढरा मळकट फुल बाहेचा शर्ट, निळ्या रंगाचा फुलपॅन्ट लोवर त्यावर घुटण्याजवळ जॉर्डन असे लिहीलेले असून फुलपॅन्ट घातलेला आहे.             मृतकाच्या नातेवाईकाचा शोध लागावा व अनोळखी इसमाची ओळख पटविण्यासाठी पोलीस नियंत्रण कक्ष, अमरावती शहर दुरध्वनी क्रमांक - 0721-2672001 किंवा वपोनी मनोहर कोटनाके  यांचा भ्रमणध्वनी क्रं. 8390151921 किंवा राजू सायगन यांचा भ्रमणध्वनी क्रं. 9823372165, 9823727600  क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरिक्षक पोलीस स्टेशन सिटी कोतवाली, अमरावती यांनी केले आहे.                                                         00000

विभागीय आयुक्तांकडून अमरावती विभागाच्या मान्सून पूर्वतयारी आढावा;

Image
  विभागीय आयुक्तांकडून अमरावती विभागाच्या मान्सून पूर्वतयारी आढावा; जुने रस्ते-पुल व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करा - विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय          जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवा        हवामान खात्याकडून प्राप्त इशारे नागरिकांपर्यंत पोहोचवा               अमरावती, दि. 17 (जिमाका) : पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या ठिकाणी तसेच दुर्गम गावांत जलदरित्या मदत पोहोचण्याच्या दृष्टीने प्रभावी नियोजन करावे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवून हवामान खात्याचे इशारे त्वरित नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महसूल व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे. तसेच जुने रस्ते-पुल व जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन त्याचा अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय यांनी आज येथे दिले.                मान्सून पूर्व तयारीबाबत अमरावती विभाग आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली आज विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात घेण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अकोला जिल्हाधिकारी अज

आराखड्यातंर्गत सुरू असलेली कामे कालमर्यादेत पूर्ण करा - विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय यांचे निर्देश

Image
  लोणार सरोवर विकास आराखडा आढावा बैठक; आराखड्यातंर्गत सुरू असलेली कामे कालमर्यादेत पूर्ण करा - विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय यांचे निर्देश             अमरावती, दि. 17 (जिमाका) : लोणार विकास आराखड्यांतर्गत कामे प्रगतीपथावर असून शासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार कामे कालमर्यादेत पूर्ण करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ.  निधि पाण्डेय यांनी दिले.                लोणार सरोवर विकास आराखडा आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली आज विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात घेण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठचे कुलगुरु डॉ. मिलिंद बाराहाते, पर्यटन विभागाचे शैलेंद्र बोरसे, बुलडाणाचे उपमुख्य वनसंरक्षक सुशांत पाटील व उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी दूरदृष्य  प्रणालीव्दारे उपस्थित होते.तर उपायुक्त संजय पवार, हर्षद चौधरी, विशेष कार्य अधिकारी सुशील आग्रेकर, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा आदी यावेळी उपस्थित होते.              श्रीमती पाण्डेय म्हणाल्या की, बेसॉल्ट खडकात उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार

विभागीय आयुक्तांकडून अमरावती विभाग खरीप नियोजनाचा आढावा; निविष्ठांच्या आवश्यक पुरवठ्यासाठी काटेकोर कार्यवाही करा - विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय

Image
  विभागीय आयुक्तांकडून अमरावती विभाग खरीप नियोजनाचा आढावा; निविष्ठांच्या आवश्यक पुरवठ्यासाठी काटेकोर कार्यवाही करा -          विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय अमरावती, दि. 16 (जिमाका):आगामी खरीप हंगामात कृषी निविष्ठांची उणीव भासू नये यासाठी नियोजनानुसार काटेकोर अंमलबजावणी करावी. अनधिकृत व बोगस बियाणे, खते आदी गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कडक कार्यवाही करा, असे निर्देश विभागाीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय यांनी आज येथे दिले. अमरावती विभागाची खरीप हंगाम-2024 पूर्वनियोजन सभा विभागाीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली आज विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार, बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, यवतमाळ जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, वाशिम जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी हे संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथून   दूरदृष्य   प्रणालीव्दारे उपस्थित होते. तर विभागीय कृषी सहसंचालक के. एस. मुळे, उ

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना; 25 मेपर्यंत अर्ज मागविले

  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना; 25 मेपर्यंत अर्ज मागविले                अमरावती, दि. 14 (जिमाका) : सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांचे देयक कोषागारातुन पारित झाले आहे त्या विद्यार्थ्यांचे लाभ देण्यासाठी शासनाने आभासी वैयक्तिक ठेव लेखा योजना(VPDA) शासनाने सुरू केली आहे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांचे पे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांनी नमुना अ परीपुर्ण भरून पॅनकार्ड व रद्द केलेला धनादेश कागदपत्रे जोडुन दि. 25 मे 2024 पर्यंत कार्यालयात सादर करावे. अपूर्ण कागदपत्रे असल्यास निधी वितरीत केल्या जाणार नाही, याची नोंद घ्यावी. तरी विहित मुदतीत अर्ज सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

Image
  छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन                  अमरावती, दि. 14 (जिमाका) : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज नायब तहसिलदार राजु वानखडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थितांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. 0000

नाशिक येथे प्रेरणा रॅलीचे आयोजन; जिल्ह्यातील तायक्वांदो खेळाडूंनी प्रेरणा रॅलीचा लाभ घ्यावा

  नाशिक येथे प्रेरणा रॅलीचे आयोजन; जिल्ह्यातील तायक्वांदो खेळाडूंनी प्रेरणा रॅलीचा लाभ घ्यावा               अमरावती, दि. 14 (जिमाका) : बॉईज स्पोटर्स कंपनी आर्टीलरी सेंटर नाशिक रोड येथे दि.17 ते दि.19 मे 2024 या कालावधीत साधारण व सिध्द खेळाडूंना स्पोटर्स कॅडेट म्हणून समाविष्ट करण्यासाठी प्रेरणा रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीकरिता जिल्ह्यातील तायक्वांदो खेळाडूंनी प्रेरणा रॅलीचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आशिष बिजवाल यांनी केले आहे.               या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडूंची वयोमर्यादा 08 ते 14 वर्षे असून यासाठी सहा रंगीत पासपेार्ट फोटो तसेच जन्मपत्र, जात प्रमाणपत्र, चारित्र्य प्रमाणपत्र, अधिवास प्रमाण पत्राच्या मूळ प्रती आणि जिल्हा पातळीवर खेळले असल्यास त्या खेळाचे मूळ प्रमाणपत्र ही लागणारी आवश्यक कागदपत्रे आहेत. 000000

मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक; आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय व संपर्क आवश्यक - जिल्हाधिकारी सौरभ कटियार

Image
  मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक; आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय व संपर्क आवश्यक - जिल्हाधिकारी सौरभ कटियार                अमरावती, दि. 13 (जिमाका) : मान्सून काळात येणाऱ्या पाऊस, पूर, वीज तसेच अन्य आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय व संपर्क आवश्यक आहे. वेळेवर संपर्क स्थापित करुन आपण प्रतिसाद देऊ शकतो, त्यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष व सज्ज राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे दिले.            जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व आढावा बैठक महसूल भवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, धारणी उपविभागीय अधिकारी रिचर्ड यान्थन, भातकूली उपविभागीय अधिकारी मीनू पी.एम., निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. संजय कावरे, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व तहसीलदार आदी उपस्थित होते.           जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले की, पावसाळ्याच्या दिवसात संपर्क तुटणाऱ्या गावांना पुरेशा प्रमाणात औषधसाठा, धान्य पुरवठा करण्यासाठी नियोजन करावे. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार फ

भरडधान्य खरेदी नोंदणीसाठी 31 मेपर्यंत मुदतवाढ

  भरडधान्य खरेदी नोंदणीसाठी 31 मेपर्यंत मुदतवाढ               अमरावती, दि. 09 (जिमाका) :   आधारभूत किंमत खरेदी योजनेत भरडधान्य ज्वारी,मका व रागी खरेदीसाठी शेतकरी बांधवांची ऑनलाईन नोंदणीसाठी अर्ज मागविले होते. परंतु नोंदणी पुरेशी झालेली नसल्याने भरडधान्य खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीकरीता मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी पात्र व इच्छूक शेतकऱ्यांनी दि. 31 मेपर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी, अमरावती यांनी केले आहे.               आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्य शासनामार्फत भरडधान्य ज्वारी, मका व रागी खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यात नांदगाव खंडेश्वर, चांदुर रेल्वे, तिवसा, मोर्शी, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चांदुर बाजार या नऊ तालुक्यात खरेदी केंद्रे उघडण्यात आली आहेत.               शेतकरी नोंदणी करतांना या हंगामापासून ज्या शेतकऱ्यांचा 7/12 त्यामध्ये पिकपेऱ्याची नोंद असावी,आधार कार्ड, ॲक्टीव बँक खातेची अचूक माहिती या सर्व तपसिल दयावा, त्याशिवाय नोंदणी पूर्ण होत नाही.   त्या शेतकऱ्याने लाई

जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत विविध उपक्रम

  जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत विविध उपक्रम                    अमरावती, दि. 09 (जिमाका): तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाण्याचे प्रमाण तरूणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. 31 मे रोजी जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येत आहे.               दरवर्षी 31 मे जागतिक तंबाखू नकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. लोकांमध्ये तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करून तंबाखू सारख्या वाईट व्यसनापासून दुर करणे हे या कार्यक्रमाचा उद्देश आहे. विविध उपक्रमातंर्गत शाळेतील मुलांना मार्गदर्शन कार्यशाळा, सोशल मीडिया, कोटपा 2003 कायद्याविषयी माहिती अशा विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. या वर्षीचे जागतिक तंबाखू नकार दिवसाचे घोषवाक्य ‘तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे सरंक्षण’ हे आहे.                            तंबाखूचे उत्पादन आणि सेवन यामध्ये भारताचा दुसरा क्रमांक असून तोंडाच्या कॅन्सरसाठी पहिला क्रंमाक लागतो. 63 टक्के मृत्यू असंसर्गजन्य आजार जसे की उच्चरक्तदाब मधुमेह, कर्करो

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची सुवर्ण संधी

  भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची सुवर्ण संधी                अमरावती, दि. 09 (जिमाका): भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड(एसएसबी) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील नवयुवक, नवयुवतीसाठी   दि. 20 ते 29 मे, 2024 या कालावधीत सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड कोर्स क्र. 57 आयोजित करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क व्यवस्था करण्यात आली आहे.                 अमरावती जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथे दि. 15 मे 2025 मुलाखतीस हजर रहावेत. मुलाखतीस येते वेळी सैनिक कल्याण विभाग, पूणे (Department of Sainik Welfare, Pune) या वेबसाईट वर सर्च करुन त्यामधील एसएसबी-57 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची

मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती महाडीबीटी प्रणालीवर कार्यान्वित; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

  मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती महाडीबीटी प्रणालीवर कार्यान्वित; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन            अमरावती, दि. 09 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनूसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्ष 2023-24 पासुन ऑनलाईन महाडीबीटी प्रणालीवर कार्यन्वीत करण्यात आलेली आहे. त्यानुसार सर्व शाळांनी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांचे विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन सादर करावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.               इयत्ता नववी व दहावी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती, साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती, इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थीनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क या

अक्षय तृतीया मुहूर्तावर बालविवाह करणाऱ्यावर होणार कारवाई - जिल्हाधिकारी सौरभ कटियार

Image
  अक्षय तृतीया मुहूर्तावर बालविवाह करणाऱ्यावर होणार कारवाई -         जिल्हाधिकारी सौरभ कटियार            अमरावती , दि . 09 ( जिमाका ): बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 आणि महाराष्ट्र बालविवाह प्रतिबंध अधिनियम संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे . दि . 10 मे रोजी साजऱ्या होणाऱ्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात बालविवाह होण्याची शक्यता आहे . त्यामुळे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बालविवाह करणाऱ्यावर अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई केल्या जाईल , असे सूचना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले .               बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार अक्षय तृतीया या दिवशी होणारे बालविवाह लावण्यास प्रोत्साहन देणाऱ्या व बालविवाह लावण्याऱ्यावर बालविवाह प्रतिबंध अधिनियमानुसार कारवाई केल्या जाते . मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण व मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे . तसे नसल्यास विवाह लावून देणाऱ्या व्यक्ती , विवाहात उपस्थित सर्व नागरिक , कॅटरर्स , मंडप डेकोरेशन , फोटोग्राफर , लग्नविधी करणारे व आद