मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती महाडीबीटी
प्रणालीवर कार्यान्वित;
ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 09 (जिमाका) : सामाजिक न्याय
व विशेष सहाय्य विभागामार्फत अनूसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत
विविध मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्ष 2023-24 पासुन ऑनलाईन महाडीबीटी
प्रणालीवर कार्यन्वीत करण्यात आलेली आहे. त्यानुसार सर्व शाळांनी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती
योजनांचे विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन सादर करावे, असे आवाहन जिल्हा
समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.
इयत्ता नववी व दहावी मध्ये शिकणाऱ्या
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती, साफसफाई व आरोग्यास धोकादायक
क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती, इयत्ता पाचवी
ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थीनींना सावित्रीबाई
फुले शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता
शिष्यवृत्ती, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क या योजना राबविण्यात
येतात.
योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी प्रणालीच्या
http://prematric.mahait.org/Login/ या वेब लिंकवर ऑनलाईन अर्ज नोंदणी करावे. महाडीबीटी
प्रणालीमध्ये पात्र सर्व अनूसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे 100 टक्के अर्जांची नोंदणी
जिल्ह्यातील शासनमान्य शाळेच्या मुख्याध्यापक करावी. महाडीबीटी डॅशबोर्ड नुसार जिल्ह्यातील
शासन मान्य 2935 शाळांपैकी 454 शाळांनी महाडीबीटीवर पोर्टलवर नोंदणी केलेली असून उर्वरित
2481 शाळांनी त्वरीत महाडीबीटी प्रणालीवर नोंदणी करून विद्यार्थ्यांचे अर्ज तात्काळ
भरावे.
000000
No comments:
Post a Comment