Wednesday, May 22, 2024

जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत विविध उपक्रम

 

जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत विविध उपक्रम

                  अमरावती, दि. 22 (जिमाका): तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाण्याचे प्रमाण तरूणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. 31 मे रोजी जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

 

            दरवर्षी 31 मे जागतिक तंबाखू नकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. लोकांमध्ये तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करून तंबाखू सारख्या वाईट व्यसनापासून दुर करणे हे या कार्यक्रमाचा उद्देश आहे. विविध उपक्रमातंर्गत शाळेतील मुलांना मार्गदर्शन कार्यशाळा, सोशल मीडिया, कोटपा 2003 कायद्याविषयी माहिती अशा विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. या वर्षीचे जागतिक तंबाखू नकार दिवसाचे घोषवाक्य ‘तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे सरंक्षण’ हे आहे.

           

           तंबाखूचे उत्पादन आणि सेवन यामध्ये भारताचा दुसरा क्रमांक असून तोंडाच्या कॅन्सरसाठी पहिला क्रंमाक लागतो. 63 टक्के मृत्यू असंसर्गजन्य आजार जसे की उच्चरक्तदाब मधुमेह, कर्करोग, (तोंडाचा, स्तनचा, गर्भाशय मुखाचा) पक्षाघात, फुफ्फुसाचे आजारामुळे होतात. यासाठी काही घटक कारणीभूत आहेत. असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव, मद्याचे अतिप्रमाणात सेवन,  तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन आणि ताणतनाव या घटकांना आटोक्यात ठेवल्यास मृत्यूच्या प्रमाण टाळू शकतो.

 

कोटपा 2023 कायद्यातील विविध कमलानुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान, तंबाखूजन्य पदार्थांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जाहिराती करण्यास, 18 वर्षातील मुलांना तंबाखू विकणे किंवा त्यांच्याकडून विक्री करणे तसेच शैक्षणिक संस्थेचा 100 मीटर परिसरात तंबाखू विकण्यास बंदी आहे. कलम 7 अंतर्गत तंबाखू जन्य पदार्थांच्या वेष्टनावर किंवा पाकिटावर चित्रमय धोक्याची सूचना देणे बंधनकारक आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या दि. 10 जुलै 2023 च्या शासननिर्णय नुसार सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालये, सुध्दा तंबाखू मुक्त ठेवण्याचे निर्देश आहे. शासकीय परिसरात तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे, बाळगणे कायद्याने गुन्हा आहे. अशा वाईट व्यसनापासून तरूणांना वाचविण्यासाठी सर्व शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था व नागरीकांनी पुढाकार घेऊन तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहून आपल्या परिवाराला निरोगी ठेवा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 14.11.2024

                                                        गृहमतदानाला जिल्हाधिकारी यांची भेट अमरावती, दि. 14 (जिमाका) : जिल्ह्यात आजपासून ज्ये...