Friday, May 31, 2024

मतमोजणी परिसरात 4 जून रोजी 144 कलम लागू

 

 

मतमोजणी परिसरात 4 जून रोजी 144 कलम लागू

          अमरावती, दि. 31 (जिमाका): लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअनुषंगाने 07-अमरावती लोकसभा मतदारसंघा 26 एप्रिल 2024 रोजी मतदान झाले. मतमोजणी दि. 4 जून 2024 रोजी लोकशाही भवन, विद्यापीठ रोड, अमरावती येथे होणार आहे.

 

          त्यानुषंगाने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतमोजणीच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले असल्याचे आदेशात नमुद केले  आहे.

 

          मतमोजणी केंद्राच्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरात सर्व पक्ष कार्यालय उमेदवारांचे मंडप, मोबाईल फोन, वायरलेस सेट, ट्रांझीस्टर, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन व निवडणूक कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश प्रतिबंध करण्यात आला आहे. सदरील आदेश निवडणुकीची कामे हाताळतांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून दि. 4 जूनच्या मध्यरात्रीपासून ते मतमोजणीची प्रक्रीया संपेपर्यंत अंमलात राहणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 14.11.2024

                                                        गृहमतदानाला जिल्हाधिकारी यांची भेट अमरावती, दि. 14 (जिमाका) : जिल्ह्यात आजपासून ज्ये...