Monday, May 6, 2024

शासकीय तंत्रनिकेतन येथे नि:शुल्क रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशनर प्रशिक्षण

 

शासकीय तंत्रनिकेतन येथे नि:शुल्क रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशनर प्रशिक्षण

          अमरावती, दि. 06 (जिमाका): भारत सरकार पुरस्कृत कौशल्य विकास व उद्योजकता विकास मंत्रालय व केंद्रिय प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत कम्युनिटी डेव्हलपमेंट थ्रु पॉलीटेक्निक योजना शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती येथे राबविण्यात येत. स्वंयरोजगारासाठी उपयुक्त तांत्रिक कौशल्यावर आधारित रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशनर या कोर्ससाठी सहा महिने कालावधीचे नि:शुल्क प्रशिक्षण शासकीय तंत्रनिकेतन येथे होणार आहे. 

             सदर प्रशिक्षण ग्रामिण अल्प शिक्षित युवक व युवतींसाठी असुन प्रशिक्षणासाठी वयाची अट नाही.  प्रशिक्षणासाठी अर्ज योजनेच्या कार्यालयामध्ये उपलब्ध असून मुलाखतीव्दारे प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यात येईल. अधिक माहितीसाठी कम्युनिटी डेव्हलमेंट थ्रु पॉलिटेक्निक योजना कार्यालय, मुलींचे वसतीगृह समोर, शासकीय तंत्रनिकेतन परीसर गाडगे नगर, अमरावती येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ. व्हि. आर. मानकर व योजनेचे समन्वयक प्रा.एम. डब्ल्यु. ठाकरे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 10.06.2026

  शुक्रवारी जागतिक बाल कामगार प्रथाविरोधी दिन अमरावती, दि. 10 (जिमाका) : बालमजुरी या अनिष्ठ प्रथेविरूद्ध विस्तृत प्रमाणात जनजागृती करणे आवश्...