शहरात कलम 37 (1)
व (3) लागू
अमरावती, दि. 20 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी
पोलीस आयुक्त (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र
पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा
व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात
आला असून दि. 21 मे ते 4 जून 2024 च्या मध्यरात्रीपर्यंत
लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल,
असे पोलीस आयुक्त (अमरावती शहर) नविनचंद्र
रेड्डी यांनी कळविले आहे.
000000
No comments:
Post a Comment