अमरावती जिल्ह्यात जिल्हा निर्यात कक्ष स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल
अमरावती, दि. 31 (जिमाका): अमरावती जिल्ह्यात जिल्हा निर्यात
कक्ष स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु असून जिल्ह्यासाठी एक्सपोर्ट हब इनिशिएटिव्ह
अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली. अमरावती
विभागातील डीआयसी अधिकाऱ्यांसाठी डीजीएफटी आरए नागपूरद्वारे निर्यात प्रक्रिया या विषयावर
ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह अपर महानिदेशक विदेश व्यापार स्नेहल ढोके
यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आल होती. परकीय व्यापार महासंचालनालय,
नागपूर, पोस्ट विभाग, अपेडा (कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास
प्राधिकरण), बँक ऑफ महाराष्ट्र, एमएसएमई (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय),
फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनआणि
एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कार्यक्रमात सहभागी
झाले होते. कार्यक्रमात डीजीएफटी चमूच्या वतीने कार्यकारी अधिकारी निखील पाटील, गौरव शहारे , तरुण व्यावसायिक ध्रुव पारीक उपस्थित
होते. डीजीएफटी नागपूरच्या चमूने निर्यात कशी करावी, वित्तीय भाग, कस्टमची प्रक्रिया,
आयईसीची नोंदणी, डीजीएफटी योजनांचा लाभ कसा घ्यावा आणि अन्य बाबींविषयी सविस्तर माहिती
दिली.
येत्या काही दिवसांत डीजीएफटीतर्फे प्रत्येक
जिल्ह्यात जिल्हा निर्यात कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या जिल्हा निर्यात कक्षामध्ये
स्थानिक नागरिकांना निर्यातीसंदर्भातील संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिली जाणार असून
जिल्ह्याची निर्यात वाढविण्यात जिल्हा निर्यात कक्षाचे मोठे योगदान राहणार आहे.
000
No comments:
Post a Comment