भरडधान्य
खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु;
31
मेपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 20 (जिमाका) : आधारभूत
किंमत खरेदी योजनेतंर्गत रब्बी पणन हंगाम 2023-24 मध्ये भरडधान्य ज्वारी व मका खरेदीसाठी
तालुकास्तरावर खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. भरडधान्य खरेदीसाठी शेतकरी बांधवांसाठी
ऑनलाईन नोंदणी पोर्टल सुरु करण्यात आले असून दि. 31 मेपर्यंत शेतकऱ्यांनी नोंदणी करून
शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापन प्रशासन, विपणन प्रादेशिक व्यवस्थापक
धारणी एस. आर. महाजन यांनी केले आहे.
आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत
राज्य शासनामार्फत भरडधान्य ज्वारी व मका खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी
व्यवस्थापन प्रशासन, विपणन प्रादेशिक व्यवस्थापक धारणी कार्यालयामार्फत तालुक्यात धारणीमध्ये
आदिवासी विकास महामंडळ मार्फत बैरागड, सावलीखेडा, साद्रावाडी, चाकर्दा, हरीसाल, धारणी
तर चिखलदरा तालुकामध्ये आदिवासी विकास महामंडळ मार्फत चुरणी, गौलखेडा बाजार या आठ गावात
खरेदी केंद्रे उघडण्यात आली आहेत.
00000
No comments:
Post a Comment