Tuesday, May 14, 2024

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना; 25 मेपर्यंत अर्ज मागविले

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना;

25 मेपर्यंत अर्ज मागविले

 

             अमरावती, दि. 14 (जिमाका) : सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांचे देयक कोषागारातुन पारित झाले आहे त्या विद्यार्थ्यांचे लाभ देण्यासाठी शासनाने आभासी वैयक्तिक ठेव लेखा योजना(VPDA) शासनाने सुरू केली आहे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांचे पे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांनी नमुना अ परीपुर्ण भरून पॅनकार्ड व रद्द केलेला धनादेश कागदपत्रे जोडुन दि. 25 मे 2024 पर्यंत कार्यालयात सादर करावे. अपूर्ण कागदपत्रे असल्यास निधी वितरीत केल्या जाणार नाही, याची नोंद घ्यावी. तरी विहित मुदतीत अर्ज सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 14.11.2024

                                                        गृहमतदानाला जिल्हाधिकारी यांची भेट अमरावती, दि. 14 (जिमाका) : जिल्ह्यात आजपासून ज्ये...