Wednesday, May 22, 2024

अचलपूर येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहात प्रवेश देणे सुरू

 

अचलपूर येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहात प्रवेश देणे सुरू

 

        अमरावती, दि. 22 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अचलपूर तालुक्यातील मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहात आठवी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आरक्षणानुसार प्रवेश देणे सुरू आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशाकरीता अर्ज सादर करावा, असे आवाहन मागासवर्गीय मुलींचे वसतीगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.

 

            वसतीगृहात प्रवेशाबाबत प्रवर्ग निहाय जागा आरक्षित करण्यात आले असून ते खालील प्रमाणे आहेत.अनुसूचित जातीकरीता 80 टक्के, अनुसूचित जमाती 3 टक्के, वि.मा.प्र. 2 टक्के, इतर मागासवर्गीय 5 टक्के, वि.जा.भ.ज. 5 टक्के, दिव्यांगासाठी 3 टक्के व अनाथासाठी 2 टक्के आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. 

 

           वसतीगृहामध्ये ग्रंथालय, स्वतंत्र वाचन कक्ष, मोफत भोजन व निवास, विविध खेळ साहित्य, व्यायामाकरीता पोषक वातावरण, अध्ययन व अध्यापनाकरीता शैक्षणिक सुविधा, स्पर्धापरीक्षांचे योग्य मार्गदर्शन व शिबीर आयोजन करण्यात येतात. वर्ग आठवी, अकरावी व प्रथम वर्षासाठी रिक्त जागेनुसार दहावी ते बारावीच्या निकालानंतर प्रवेश अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्र. 7720823124, 9604308256, 8605631680 क्रमांकावर संपर्क साधावा.

 

      प्रवेशाकरीता आवश्यक कागदपत्रे : मागील वर्षाची गुणपत्रिका प्रत, पालकांची उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र , आधार, रहीवासी दाखला, बँक पासबुक झेरॉक्स(एसबीआय), शाळा सोडल्याचा दाखला प्रत, दारीद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र, बोनाफाईट, नजिकच्या सरकारी रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्वास्थ प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, गॅप सर्टीफीकेट असल्यास पालकांचे हमीपत्र करारनामा.

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 14.11.2024

                                                        गृहमतदानाला जिल्हाधिकारी यांची भेट अमरावती, दि. 14 (जिमाका) : जिल्ह्यात आजपासून ज्ये...