अनुसूचित
जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना
अमरावती, दि. 17 (जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या
जयंती वर्षानिमित्त केंद्र शासनाने स्टॅन्ड अप इंडिया ही योजना जाहीर केली आहे. या
योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना सुरु करण्यात
आली आहे.
सन 2021-22 मध्ये 5 लाभार्थ्यांना
या योजनेचा लाभ मिळाला असून सन 2024-25 साठी किमान 10 प्रस्ताव मंजूरीचे लक्ष निर्धारित
करण्यात आले आहे. या योजनेत नवउद्योजकांची मार्जिन मनी भरण्याची क्षमता नसल्यामुळे
या उद्योजक लाभार्थ्यांना एकूण उद्योग प्रकल्पाच्या 25 टक्के स्वहिस्स्यातील जास्तीत
जास्त 15 टक्के मार्जिन मनी शासनातर्फे उपलब्ध करुन देण्यात येईल. या योजनेत राज्यातील
अनुसूचित जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील
नवउद्योजकांना 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास 75 टक्के कर्ज
मंजूर केल्यानंतर उर्वरित 15 टक्के रक्कम शासनामार्फत देण्यात येते. योजनेचा शासन निर्णय
www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या योजनेसाठी इच्छुक लाभार्थ्यांनी सहायक
आयुक्त, समाज कल्याण, अमरावती यांच्याकडे शासन निर्णयातील नमूद करण्यात आलेल्या सर्व
अटी व शर्तीची पूर्तता करुन प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण
माया केदार यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment