महाडीबीटी
पोर्टलवरील विविध योजनेसंदर्भातील सूचना महाविद्यालयाच्या माहिती पुस्तिकेत समावेश
करा
- समाजकल्याण
विभागाचे आवाहन
अमरावती, दि. 24 (जिमाका): सामाजिक न्याय
व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी शिष्यवृत्ती व अन्य योजनांचा
लाभ ऑनलाईन महाडीबीटी प्रणालीद्वारे दिला जातो. या योजनांची माहिती लाभार्थ्यांना व्हावी
व त्याचा लाभ शैक्षणिक वर्षातच मिळावा यासाठी राज्य शासनाने महाविद्यालयस्तरावर प्रसिध्दी
होणाऱ्या प्रवेश प्रक्रीयेच्या माहिती पुस्तीकेत समावेश करण्याच्या सूचना दिल्या आहे.
त्यानुसार सर्व महाविद्यालयानी शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या प्रवेश प्रक्रीयेपुर्वीच्या
सर्व प्रसिध्दी होणाऱ्या माहितीपुस्तीकेत समावेश करावा, असे आवाहन सहायक समाजकल्याण
आयुक्त माया केदार यांनी केल आहे.
सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती
प्रवर्गासाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी योजना, राजश्री
शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतीपूर्ती योजना व व्यावसायिक
पाठ्यक्रमांशी संलग्न वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या योजना राबविण्यात
येतात.
योजनाअंतर्गत वर्षाला सरासरी सुमारे साडेचार
ते पाच लाख अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत
करून योजनेचा लाभ घेत आहे. संबंधित महाविद्यालये अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यानंतर देखील
अगदी शैक्षणिक वर्षाच्या अखेरपर्यंत विद्यार्थ्यांचे अर्ज नोंदणीकृत करत नाहीत. अंतत:
विद्यार्थी शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क प्रतिपुर्ती पासून वंचित राहतो. ही बाब केंद्र
शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, नवी दिल्ली तसेच राज्य शासनाच्या सामाजिक
न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निर्देशनास आली. त्यामुळे मागील शैक्षणिक वर्ष
2023-24 पासून विविध शिष्यवृत्या फ्रीशिप, विद्यावेतन योजनांकरीता महाडीबीटी पोर्टलवर
ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत करावयाची प्रक्रीया ही त्या त्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश
प्रक्रियेतील एक भाग असून महाविद्यालयांनी त्याच वर्षाच्या प्रवेश प्रक्रीयेमध्ये विद्यार्थ्यांचे
ऑनलाईन अर्ज राज्य शासनाच्या महाडीबीटीवर पोर्टलवर नोंदणीकृत करणे आवश्यक असल्याचे
धोरण राज्य शासनाने निश्चित केलेले आहे. त्यानुसार जिल्हातील सर्व महाविद्यालयानी व्यावसायिक
व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र
विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्यांचा लाभ देण्याकरिता संबंधित शिष्यवृत्ती योजनेच्या
निकषानुसार राज्य शासनाच्या
https://mahadbtmahait.gov.in या महाडीबीटीवर ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत करण्यात
यावी. तसेच महाविद्यालयास्तरावरून प्रसिध्दी होणाऱ्या प्रवेश प्रक्रीयेच्या माहिती
पुस्तीका ऑनलाईन अर्ज व संबंधित वेबसाईट पोर्टल, मोबाईल ॲपव्दारे विद्यार्थ्यांना अर्ज
भरण्याच्या सुचना द्यावी. तसेच समान संधी केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याबाबात मार्गदर्शन करण्यात
यावे.
अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ होण्यासाठी
राज्य शासनाच्या धोरणानुसार सर्व महाविद्यालयानी शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या प्रवेश
प्रक्रीयेपुर्वीच्या सर्व प्रसिध्दी होणाऱ्या माहितीपुस्तीकेमध्ये खालील बाबीचा समावेश
करावा.
1. प्रवेश निश्चित झालेल्या अनुसूचित जाती व
विविध मागास प्रर्वगातील तसेच आर्थीक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी राज्य शासनामार्फत
राबविल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्त्या किंवा फ्रिशिप इत्यादी योजनांकरीता राज्य शासनाच्या
https://mahadbtmahait.gov.in या पोर्टलवर जाऊन योजनेच्या निकषानुसार ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत
करणे आवश्यक आहे.
2. ऑनलाईन शिष्यवृत्या किंवा फ्रिशिपकरीता विद्यार्थ्यांनी
प्रवेशप्रक्रीयेव्दारे निर्धारित केलेल्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी अंतिम
प्रवेश घेतलेल्या तारखेपासून पुढील एक महिन्याच्या आत महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृती
किंवा फ्रिशिपकरीता परीपुर्ण अर्ज करणे आवश्यक आहे.
वरील
बावी सर्व महाविद्यालयानी आपल्या शैक्षणिक वर्षात प्रसिध्दी होणाऱ्या माहिती पुस्तीकेमध्ये
समावेश करण्यासंदर्भात पत्राव्दारे सूचना देण्यात आले आहे, अशी माहिती समाजकल्याण विभागाकडून
देण्यात आली आहे.
00000
No comments:
Post a Comment