Tuesday, May 21, 2024

नांदगाव खंडेश्वर येथील मुलांची शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रीया सुरू

 

नांदगाव खंडेश्वर येथील मुलांची शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रीया सुरू

 

           अमरावती, दि. 21 (जिमाका): नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांच्या शासकीय निवासी शाळेत 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता सेमी इंग्लिश माध्यमाच्या सहावी ते दहावीच्या प्रवेश प्रक्रिया सुरु झाले आहे. प्रवेशाकरीता इच्छुक पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश करावा, असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक एल. झेड. सुरजुसे यांनी केले आहे.

           

            शासकीय निवासी शाळेत प्रवेशाकरीता अर्ज दि. 28 एप्रिल ते 26 जून 2024 या कालावधीत शासकीय निवासी शाळेत मोफत उपलब्ध असून शाळेत मोफत प्रवेश दिला जातो. निवासी शाळेत मुलांना निवास, सुसज्य अद्यावत क्लास रूम, ग्रंथालय सुविधा, ई-लायब्ररी, भोजन, पाठ्यपुस्तके व गणवेश अशा प्रकारच्या सुविधा मोफत उपलब्ध असून उच्च विद्याविभुषित शिक्षकवर्ग आहे. तसेच  विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी निवासी शाळेमध्ये वेळोवेळी विविध उपक्रमाचे आयोजन केले जातात.    

       

         निवासी शाळेत प्रवेशाबाबत प्रवर्ग निहाय जागा आरक्षित करण्यात आले असून ते खालील प्रमाणे आहेत. अनुसूचित जाती मुलांकरिता 80 टक्के जागा, अनुसूचित जमाती मुलांकरिता 10 टक्के, विजाभजच्या मुलांकरिता 5 टक्के, मागास प्रवर्ग मुलांकरिता 2 टक्के, दिव्यांगण व अनाथ मुलांकरिता 3 टक्के याप्रमाणे जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. प्रवेश संदर्भातील माहितीसाठी मुख्याध्यापक एल. झेङ सुरजुसे यांचा भ्रमणध्वनी क्र. 8888958239 वर संपर्क साधावा.

                                                      0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 14.11.2024

                                                        गृहमतदानाला जिल्हाधिकारी यांची भेट अमरावती, दि. 14 (जिमाका) : जिल्ह्यात आजपासून ज्ये...