आंबा व मिलेट्स महोत्सव संपन्न
चार दिवसीय आंबा व
मिलेट्स महोत्सवाला अमरावतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अमरावती, दि. 27 (जिमाका): महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ
विभागीय कार्यालयमार्फत जाधव पॅलेस बडनेरा रोड येथे आंबा व मिल्लेट्स महोत्सवाचे
उद्घाटन विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व इतर मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न झाले
आहे. या महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम विभागीय सहनिबंधक शंकर कुंभार, सहायक
निबंधक श्री .उल्हे, कार्यकारी अभियंता सुनिल राठी, विजय जाधव तसेच पणन मंडळाचे उप
सरव्यवस्थापक दिनेश डागा यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. हापूस, केशर व विदर्भातील
वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादित इतर आंबा थेट ग्राहकांना उपलब्ध व्हावेत तसेच ज्वारी,
बाजरी, नाचणी, भगर या सारख्या मिलेट्सपासून तयार होणारी उत्पादने व कृषी माल
उत्पादने यांच्या करिता थेट ग्राहक उपलब्ध व्हावे या उद्येशाने या चार दिवसीय आंबा
व मिलेट्स महोत्सवाला अमरावतीकरांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
आंबा व मिलेट्स महोत्सव हा चांगला उपक्रम असून असे उपक्रम नियमित
घेत रहावे, असे विभागीय सहनिबंधक शंकर कुंभार यांनी सांगितले. यावेळी स्टॉल
धारकांनी आपले मनोगत व्यक्त केले . चार दिवसात स्टॉल
धारकांकडून साधारणतः पंचवीस लाखांची विक्री करण्यात आली. भविष्यात आपली विक्री वाढविण्याच्या
दृष्टीने ग्राहक व स्टॉल धारक यांचा संपर्क वाढला. भविष्यात आणखी मोठे महोत्सव
आयोजनाबाबत प्रयत्न करू जेणेकरून आंबा व इतर फळबाग मिलेट्स उत्पादने लागवड
करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढेल व उद्योग तसेच रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल,
असे पणन मंडळाकडून सांगण्यात आले.
0000
No comments:
Post a Comment