Wednesday, May 29, 2024

महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध असलेल्या पीक निहाय वाणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध असलेल्या पीक निहाय वाणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

            अमरावती, दि. 29 (जिमाका): खरीप हंगाम 2024 साठी राष्ट्रीय खाद्य तेल अभियान गळीतधान्य अंतर्गत सोयाबीन पीक प्रात्यक्षिके तसेच प्रमाणित बियाणे वितरण व राष्ट्रीय अन्न पोषण सुरक्षा अभियान कडधान्य अंतर्गत तुर, मुग, उडीद पीक प्रात्यक्षिके तसेच प्रमाणित बियाणे वितरण ह्या बाबी राबविण्यात येत आहेत. या बाबींच्या लाभासाठी लाभार्थ्यांने महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांने अर्ज करत असतांना जिल्ह्यासाठी उपलब्ध असलेल्या वाणाकरीताच अर्ज करणे आवश्यक आहे. जिल्ह्यासाठी उपलब्ध असलेले पीकनिहाय वाणाचा तपशील:

            सोयाबीन पीकासाठी पीडीकेव्ही अंबा, सुवर्ण सोया, फुले संगम, एनआरसी-130, जेएस-2034, एमऐयुएस-612, जेएस-20-116 फुले किमया, फुले दुर्वा वाण उपलब्ध आहे. तुर पिकासाठी बीडीएन -716, जीआरजी-152(भीमा), तर 10 वर्षावरील वाण आशा, मारोती, पीकेव्ही तारा, फुले राजेश्र्वरी उपलब्ध आहे. मुग पीकासाठी उत्कर्षा हे वाण तर दहा वर्षावरील वाण बीएम-2003-2, पीकेव्ही-एकेएम-4 उपलब्ध आहे. तसेच उडीद पीकासाठी एकेयु-10-1 वाण उपलब्ध आहे.  वरीलप्रमाणे उपलब्ध असलेल्या सोयाबीन वाणाच्या बियाण्यास पीक प्रात्यक्षिकाअंतर्गत रूपये 4 हजार प्रति क्विंटल व प्रमाणित बियाणे वितरण या बाबीअंतर्गत रूपये 2 हजार प्रति क्विंटल या प्रमाणे अनुदान देय आहे. तसेच प्रमाणित बियाणे वितरण या बाबीअंतर्गत तुर, मुग व उडीद बियाण्याच्या 10 वर्षाआतील वाणास रूपये 5 हजार प्रति क्विंटल व 10 वर्षावरील वाणास रूपये 2 हजार 500 प्रति क्विंटल याप्रमाणे अनुदान देय असून पीक प्रात्यक्षिकाअंतर्गत तुर, मुग व उडीद 10 वर्षाआतील वाणाच्या बियाण्यास 100 टक्के अनुदान देय राहील.

            अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, या घटकासाठी शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन लॉटरी पध्दतीने होणार आहे. तरी सर्व शेतकरी बंधू व भगिनींनी महाडीबीटी पोर्टलवर वरील घटकाअंतर्गत उपलब्ध असलेल्या पीकनिहाय वाणासाठी अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 14.11.2024

                                                        गृहमतदानाला जिल्हाधिकारी यांची भेट अमरावती, दि. 14 (जिमाका) : जिल्ह्यात आजपासून ज्ये...