अचलपूर
येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळेत प्रवेश सुरू
अमरावती, दि. 22 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागातंर्गत अचलपूर
तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा, बुरघाट येथे
सहावी ते दहावीच्या प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रवेशाकरीता इच्छुक पालकांनी
आपल्या पाल्याचा प्रवेश करावा, असे आवाहन अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय
निवासी शाळेचे मुख्याध्यापक यांनी केले आहे.
निवासी शाळेत मुलांना निवास, सुसज्य अद्यावत क्लास रूम, ग्रंथालय सुविधा,
ई-लायब्ररी, भोजन, पाठ्यपुस्तके, आठवी शिष्यवृत्ती परिक्षा तयारी, वैयक्तिक
विकासावर भर, विज्ञान केंद्र व शारिरीक शिक्षण, प्रशस्त क्रीडांगण, खेळाचे
मार्गदर्शन व गणवेश अशा प्रकारच्या सुविधा मोफत उपलब्ध आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी निवासी
शाळेमध्ये वेळोवेळी विविध उपक्रमाचे आयोजन केले जातात.
प्रवेशाकरीता
आवश्यक कागदपत्रे : मागील वर्षाची गुणपत्रिका प्रत, उत्पन्नाचा दाखला, जातीचे
प्रमाणपत्र, आधार कार्ड, रहीवासी दाखला, बँक पासबुक झेरॉक्स(एसबीआय), शाळा
सोडल्याचा दाखला, दारिद्रय रेषेखालील प्रमाणपत्र, बोनाफाईट, नजिकच्या सरकारी
रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याचे स्वास्थ
प्रमाणपत्र, पासपोर्टसाईज फोटो, गॅप सर्टीफीकेट असल्यास पालकांचे हमीपत्र,
करारनामा.
निवासी शाळेत प्रवेशाबाबत प्रवर्ग निहाय जागा आरक्षित करण्यात आले असून ते
खालील प्रमाणे आहेत. अनुसूचित जाती मुलांकरिता 80 टक्के जागा, अनुसूचित जमाती
मुलांकरिता 10 टक्के, विमाप्रकरीता 2 टक्के, विजाभज मुलांकरिता 5 टक्के, दिव्यांग
मुलांकरिता 3 टक्के जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. आरक्षणानुसार सहावा
वर्गासाठी 40 जागा, सातवीसाठी 1, आठवीसाठी 2 तर वर्ग दहावीसाठी 1 जागा रिक्त आहे.
अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्र. 7720823124, 7020635557, 8788765371 या
क्रमांकावर संपर्क साधावा.
00000
No comments:
Post a Comment