मतमोजणीसाठी
बियाणी चौक
ते
तपोवन वाहतूक मार्गात बदल
अमरावती, दि.30 (जिमाका) : लोकसभा निवडणूकीची
मतमोजणी 4 जून रोजी बियाणी चौक ते तपोवन गेट मार्गावर असलेल्या लोकशाही भवनात होणार
आहे. वाहतुकीची कोंडी अथवा कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, म्हणून सदर मार्ग वाहतुकीसाठी
बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरची वाहतूक पर्यायी मागाने वळविण्यात येणार आहे.
अशी माहिती अमरावती शहर वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त प्रशांत राजे यांनी कळवली
आहे.
हे मार्ग बंद असतील
बियाणी चौक ते तपोवन गेट हा मार्ग सर्व प्रकारांच्या
वाहनांच्या वाहतुकीसाठी 4 जूनच्या सकाळी 6 वाजतापासून ते मतमोजणी प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत
बंद राहणार आहे.
हे असतील पर्यायी मार्ग
मार्डी मार्गे येणार तसेच तपोवन गेट
परिसरातील निवासी वसाहतील वाहन चालकांना अमरावती शहरात येण्याकरीता पर्यायी मार्ग:
विद्यापीठ चौक, रचना सृष्टी, विक्रांत लॉन, दंत महाविद्यालय, वडाळी ओवरब्रिज चौक, अंधविद्यालय,
चपराशीपूरा या मार्गाचा अवलंब करावा.
बियाणी
चौक येथून मार्डी रोडकडे तसेच तपोवन परिसरातील निवासी वसाहतीत जाणाऱ्या वाहन चालकांना
पर्यायी मार्ग: बियाणी चौक, चपराशीपूरा, अंधविद्यालय, वडाळी ओवरब्रिज चौक, दंत विद्यालय,
विक्रांत लॉन, रचना सृष्टी, विद्यापीठ चौक.
बियाणी चौक ते विद्यापीठ चौक मार्गावरील नागरी
वस्ती चिलम छावणी, व्यंकय्यापूरा, जिजाऊ नगर, ओम कॉलनी येथील वाहन चालकांना मुख्य मार्गावर
प्रवेश बंद राहणार असल्याने त्यांनी परिसरातील उपलब्ध पर्यायी मार्गाचा वापर करावा.
फक्त शिवनेरी कॉलनी, पंकज कॉलनी, परिसरातील
रहिवासी नागरिक व या मार्गावरील कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग कार्यालयातील कर्मचारी
यांना पर्यायी मार्ग नसल्याने त्यांनी आपले वाहनाने कार्यालय व निवास्थानी जाण्या-येण्यासाठी
बियाणी चौकाकडे जाणाऱ्या मार्गाचा वापर करावा. तसेच फक्त उत्कर्ष कॉलनी, पोस्टल कॉलनी,
एच. पी. गॅस गोडाऊन, कोषागार कार्यालय, प्रबोधीनी, कार्यकारी अभियंता, विशेष प्रकल्प,
दक्षता व गुण नियंत्रण मंडळ, पशुसंवर्धन कार्यालय, भूजल सर्वेक्षण यंत्रणा, महाबिज
कर्मचारी यांनी पर्यायी मार्ग नसल्याने त्यांनी आपले वाहनाने कार्यालय व निवास्थानी
जाण्या-येण्यासाठी विद्यापीठ चौकाकडे जाणाऱ्या मार्गाचा वापर करावा. सुट देण्यात आलेले
निवासी नागरिक यांनी सोबत रहिवास पुरावा तसेच कार्यालयीन कर्मचारी यांनी कार्यालयीन
ओळखपत्र सोबत बाळगावे. तसेच आवश्यक वेळीस वाहनांचा वापर करावा. सदर आदेश, अधिसुचनेचे
जो कोणी वाहनचालक पालन करणार नाही त्यांचे विरूध्द मोवाका 1988 व महराष्ट्र पोलीस कायदा
1951 अन्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. पोलीस आयुक्तालय,
अमरावती शहर व वाहतुक विभाग, अमरावती शहर कडून सर्व नागरिकांना याव्दारे जाहीर आवाहन
करण्यात येते की, आदेशात नमुद निर्बंधाचे सर्व वाहन चालकांनी काटेकोरपणे पालन करून
पोलीस विभागास आवश्यक सहकार्य करावे.
0000
No comments:
Post a Comment