जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न;
प्रलंबित
प्रकरणाचा जलद निपटारा करा- अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे
अमरावती, दि. 21 (जिमाका) : अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा
1989 अंतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची सभा अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे
यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज संपन्न झाली. यावेळी शहरी व
ग्रामीण विभागात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यातंर्गत घडलेले गुन्हे
तसेच प्रलंबित गुन्ह्यांबाबत चर्चा करण्यात आली.
अपर जिल्हाधिकारी श्री. वाघमारे यांनी प्रलंबित प्रकरणांचा लवकरात लवकर तपास
पूर्ण करून दोषारोप न्यायालयात दाखल करण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या. तसेच निधी
अभावी प्रलंबित प्रकरणांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्याबाबत
निर्देश दिले. यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त माया केदार, अमरावती शहर गुन्हे शाखा
पोलीस निरिक्षक राहुल आठवले, ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सतिश पाटील, सहायक पोलिस अधिक्षक के.पी. सुलभेवार,
शासकीय अभियोक्ता रश्मी भागवत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दक्षता समितीच्या बैठकीमध्ये माहे एप्रिल 2024 पर्यंतच्या प्रलंबित असलेल्या
प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. तसेच माहे एप्रिलमध्ये एकुण अनुसूचित जाती व जमातीचे
शहर विभागात 6 तर ग्रामिण विभागात 6 प्रकरणे दाखल झाली असल्याची माहिती यावेळी देण्यात
आली. न्यायालयात प्रलंबित प्रकरणे, अर्थसहाय्यासाठी प्रलंबित प्रकरणाचा आढावा यावेळी घेण्यात आला.
000000
No comments:
Post a Comment