मतमोजणी प्रक्रियेसाठी लोकशाही भवन सज्ज
अमरावती दि. 3 (जिमाका)
: 07 -अमरावती लोकसभा मतदारसंघतील मतमोजणी
उद्या, मंगळवार दिनांक 4 जून 2024 रोजी विद्यापीठ रोडवरील लोकशाही भवन येथे सकाळी आठ
वाजेपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर लोकशाही भवन येथे सामान्य निरीक्षक सी.जी . रजनीकांथांन, मतमोजणी
निरीक्षक श्रीमती अंजना पंडा, जिल्हा निवडणूक
अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे , सागर पाटील, जिल्हा
उप निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी आज येथील मतमोजणीच्या विविध टप्प्यातील कामाचे
नियोजन , सुरक्षा व्यवस्था, माध्यम कक्ष तसेच अन्य कक्षांची पाहणी करुन मतमोजणीची प्रक्रिया
शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधितांना निर्देश दिलेत .
0000
No comments:
Post a Comment