अमरावती येथील मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश सुरु
अमरावती, दि. 18 (जिमाका): अमरावती येथील
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश
प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रवेश इच्छुक दहावी पास मुलींनी ऑनलाईन अर्ज करावा, असे
आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेश शेळके व गटनिदेशक प्रमोद
कोळमकर यांनी केले आहे.
मुलींची औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शासकीय संस्थेमध्ये
इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिक, इन्फॉरमेशन, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी अॅन्ड सिस्टीम
मेंटेनन्स, ड्रॉप्समन, फैशन टेक्नॉलॉजी, ड्रेस मेकींग, बेसिक कॉस्मेटॉलॉजी, फ्रुट
अॅन्ड व्हेजिटेबल प्रोसेसींग, बेकर अॅन्ड कन्फेक्शनर, इंटेरिअर डेकोरेशन
डिझायनिंग, कॉम्प्युटर ऑपरेटर अॅन्ड प्रोग्रामिंग असिस्टंट, मल्टीमिडीया, अॅनिमेशन
अॅन्ड स्पेशल इफेक्ट्स या व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन प्रवेश सुरु झाले आहे.
प्रवेश इच्छुक दहावी पास मुलींनी व महिलांनी http://admission.dvet.in या
संकेतस्थळाला भेट देवून नोंदणी प्रक्रीया पूर्ण करवी. अधिक माहीतीसाठी मुलींच्या
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भेट द्यावी.
000000
No comments:
Post a Comment