माजी सैनिकांसाठी शिक्षक पदभरती; 18 जूनला उपस्थित
राहण्याचे आवाहन
अमरावती, दि. 13 (जिमाका): शिक्षक आयुक्तालयामार्फत
माजी सैनिक समांतर आरक्षण अंतर्गत माजी सैनिकांची शिक्षक पदभरती केली जाणार आहे. त्यानुसार
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार राज्यस्तरावर शिक्षक पदासाठी डीईडी, बीईडी,
बीपीईडी, सीटीईटी, टीईटी अहर्ताधारक पात्र माजी सैनिक, शहीद सैनिकाचे वारस व वीर पत्नी
यांनी सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथे दि. 18 जुन रोजी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित
राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment