राष्ट्रीय
लोक अदालत 27 जुलैला
अमरावती, दि.14 (जिमाका): अमरावतीसह जिल्ह्यातील सर्व न्यायालयांत शनिवार,
दि. 27 जुलै, रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे
आयोजन करण्यात आले आहे. अदालतीत दाखल व दाखलपूर्व अशी प्रकरणे तडजोडीने व सामंजस्याने
निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. नागरिक तसेच पक्षकारांनी लोकअदालती समक्ष आपली प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा
प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. देशपांडे यांनी केले आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र
राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सूचनेनुसार
राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे
अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. नागरिक
तसेच पक्षकारांनी तडजोडप्राप्त प्रलंबित खटले
लोकअदालती समक्ष तडजोडीने व सामंजस्याने मिटविण्यासाठी संबंधित न्यायालयात अर्ज
करावा. तसेच (दाखलपूर्व) प्रकरणांबाबत नजिकच्या संबंधित जिल्हा किंवा तालुका न्यायालयांशी
संपर्क साधावा. तरी संबंधितांनी आपली प्रकरणे लोकअदालतीत सामंजस्याने व तडजोडीने मिटवावे,
असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम. डी. कांबळे यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment