Tuesday, June 18, 2024

अनुसूचित जाती व नवबौध्द मुलामुलींच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरु

 

अनुसूचित जाती व नवबौध्द मुलामुलींच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरु

 

          अमरावती, दि. 18 (जिमाका): सामाजिक न्याय विभागातंर्गत कार्यरत असलेल्या  अनुसूचित जाती व नवबौध्द मुलामुलींच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सन 2024-25 करीता वर्ग सहावी ते दहावीपर्यंतच्या प्रवेशासाठी इच्छुक पालक व विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह संबंधित शासकीय निवासी शाळेच्या मुख्यध्यापकांशी संपर्क साधावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सरिता बोबडे यांनी केले आहे.

 

             जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागातंर्गत कार्यरत धामणगांव रेल्वे तालुक्यातील हिंगणगांव,  अचलपूर तालुक्यातील बुरडघाट व अंजनगांव सुर्जी तालुक्यातील पांढरी येथील तीन मुलींच्या शासकीय निवासी शाळेत तर दर्यापूर तालुक्यातील सामदा, चांदूर रेल्वे तालुक्यातील तुळजापूर, अमरावती तालुक्यातील बेनोडा व  नांदगांव खंडेश्वर येथील चार मुलांच्या शासकीय निवासी शाळेत अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु असून संबंधित ठिकाणी प्रवेश अर्ज उपलब्ध आहे.  

 

          अनुसूचित जाती व नवबौध्द मुलामुलींच्या शासकिय निवासी शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश, भोजन, निवास व अंथरुण-पांघरुण इत्यादी सुविधा मोफत पुरविण्यात येतात. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावरील संबंधित शासकिय निवासी शाळेत संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 0721-2661261 वर संपर्क साधावा.

00000

 

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...