बाल धोरण मसूदा; सुधारणा, हरकती, सुचना मागविल्या
अमरावती,
दि. 07 (जिमाका): महिला व बालविकास विभागातर्फे बाल धोरणाचा प्रारुप मसूदा तयार करण्यात
आला आहे. तज्ज्ञ व्यक्ती व शासनाचे अधिकारी यांचा समावेश असलेल्या समितीने हा मसूदा
तयार केला आहे. महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा 2022 असा हा मसूदा तयार आहे.
हा मसूदा शासनाच्या https://womenchlid.maharashtra.gov.in व
https://www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. प्रस्तावित
बालधोरण हे इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध असून त्यात आवश्यक बाबी, सुचना, सुधारणा,
हरकती तसेच शब्दरचना, व्याकरण इ. संदर्भाने हरकती व सुचना नागरिकांकडून मागविण्यात
आल्या आहेत. या सुचना नागरिकांनी दि.30 जून रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत महिला व
बालविकास आयुक्तालय, 28 राणीचा बाग, जुन्या सर्किट हाऊस जवळ, पुणे यापत्त्यावर अथवा
childpolicy@gmail.com या इ-मेल पत्त्यावर पाठविण्यात यावा, असे आवाहन महिला व बालविकास
विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment