दर्यापूर
येथील शासकीय मागासवर्गीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू
अमरावती, दि. 10 (जिमाका): दर्यापूर येथील
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह व 125 वी जयंती मागासवर्गीय
मुलींचे शासकीय वसतिगृह येथे प्रवेशासाठीचे अर्ज वितरित होत आहेत. इच्छूकांनी अर्ज
करण्याचे आवाहन गृहपाल वनिता गोळे यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागातंर्गत
मागासवर्गीय मुलामुलींचे शासकीय वसतिगृह कार्यरत असून शैक्षणिक सत्र 2024-25 करीता
शालेय तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन विभागासाठी ऑफलाईन प्रवेशप्रक्रीया सुरू झाली आहे.
प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी वसतिगृहातुन अर्ज प्राप्त करून संपूर्ण कागदपत्रासह विहित मुदतीत अर्ज सादर करावे.
00000
No comments:
Post a Comment