कृषि निविष्ठा सनियंत्रणासाठी जिल्हा व तालुकास्तरीय
भरारी पथक व नियंत्रण कक्षाची स्थापना;
तक्रारी नोंदविण्याचे आवाहन
अमरावती, दि. 25 (जिमाका): खरीप हंगामाची
सुरुवात झाली आहे. हंगामामध्ये शेतकऱ्यांना गुणवत्ता पुर्ण कृषी निविष्ठा, बियाणे,
खते व किटकनाशके योग्य दराने उपलब्ध व्हावी तसेच कृषी निविष्ठेच्या गुणवत्तेबाबतच्या
तक्रारी, जादा दराने किंवा मुदत बाह्य कृषी निविष्ठांची विक्री, साठेबाजी व अनाधिकृत कृषी निविष्ठांची विक्री करणे,
अशा प्रकारच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर भरारी पथक व नियंत्रण
कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते
यांनी दिली.
जिल्हास्तरावर जिल्हा कृषि कार्यालय, अमरावती
येथे नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून संपर्क अधिकारी म्हणून जिल्हा गुणवत्ता
नियंत्रण निरीक्षक सागर डोंगरे (7588501893) व प्रविण खर्चे (9423185282) यांची नेमणूक
करण्यात आली आहे.
तालुकास्तरावर अमरावती तालुक्यासाठी तालुका
कृषी अधिकारी रोहिणी उगले (8308047778), कृषी अधिकारी उध्दव भायेकर(8275283001), भातकुलीसाठी
तालुका कृषी अधिकारी प्रमोद खर्चान (9404689720), कृषी अधिकारी अश्विनी चव्हाण(7774884148),
नांदगाव खंडेश्वरसाठी तालुका कृषी अधिकारी रोशन इंदोरे(7875421450), कृषी अधिकारी लक्ष्मण
खांडरे (8275229532), चांदुर रेल्वेसाठी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र बाबल
(8975961695), कृषी अधिकारी श्री. राणे (9421366613), धामणगाव रेल्वे तालुक्यासाठी
तालुका कृषी अधिकारी प्रशांत गुल्हाणे(8275293459), कृषी अधिकारी राजु सावळे
(8379909305), अचलपूर तालुक्यासाठी तालुका कृषी अधिकारी किरण मुळे (9545186677), कृषी
अधिकारी रवि उइके (9404075276), अंजनगाव सुर्जी तालुक्यासाठी तालुका कृषी अधिकारी राजाभाऊ
तराळ(9404689715), कृषी अधिकारी अश्विन राठोड (9422016056), दर्यापूर तालुक्यासाठी
तालुका कृषी अधिकारी राजकुमार अडगोकर(9850175401), कृषी अधिकारी सुरेश रामागडे
(9096238655), चिखलदरा तालुक्यासाठी तालुका कृषी अधिकारी लहुजी आडे(8275068639), कृषी
अधिकारी शालीनीताई वानखडे (9049555011), धारणी तालुक्यासाठी तालुका कृषी अधिकारी सुधीर
ईशी (9422260200), कृषी अधिकारी धैर्यशिल पाटील (8275935084), मोर्शी तालुक्यासाठी
तालुका कृषी अधिकारी माधुरी निंबाळकर (8668718238), कृषी अधिकारी राहुल चौधरी
(9421827693), वरूड तालुक्यासाठी तालुका कृषी अधिकारी अतुल आगरकर(9766547133), कृषी
अधिकारी पवन ढोमणे (9595903320), तिवसा तालुक्यासाठी तालुका कृषी अधिकारी निलेश राठोड
(9421160188), कृषी अधिकारी पी एन खोबरखेडे (9763737259), चांदुर बाजार तालुक्यासाठी
तालुका कृषी अधिकारी फाल्गुनी ननीर(7558508883), कृषी अधिकारी गजानन राऊत
(8055834230) यांची निरिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
जिल्हास्तरावर तक्रार नियंत्रण कक्षाकरीता
व्हॉट्सॲप क्रमांक 9834579012 असुन कृषि विभाग टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 आहे. निविष्ठाबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी भ्रमणध्वनी
क्रमांकावर एसएमएस, व्हॉट्सॲपचे माध्यमातुन नोंदविण्यात यावे, असे आवाहन कृषि विभागाकडून
करण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment