पंडित दीनदयाल उपाध्याय महिला रोजगार मेळावा; हिंदुस्थान
युनिलिव्हर कंपनीमध्ये 66 महिलांची प्राथमिक निवड
अमरावती, दि. 07 (जिमाका): जिल्हा कौशल्य
विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर अमरावती तथा शासकिय
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती यांचे संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. 6 जुन रोजी
शासकिय औद्यौगिक प्रशिक्षण संस्था येथे पंडित दीनद्याल उपाध्याय महिला रोजगार मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात
हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड या नांमाकित कंपनीमध्ये 66 महिलांची प्राथमिक निवड करण्यात
आली.
महिला रोजगार मेळाव्यामध्ये ऑनलाईन,ऑफलाईन
असे एकुण 216 महिला उमेदवारांनी सहभाग नोंदवून त्यापैकी 87 महिला उमेदवारांनी प्रत्यक्ष
मुलाखती दिल्या. मुलाखती दिलेल्या महिला उमेदवारांपैकी 66 महिला उमेदवारांची प्राथमिक
निवड करण्यात आली. मेळाव्याकरिता जिल्ह्यातील आणि इतर जिल्ह्यातील महिला उमेदवार उपस्थित
राहून मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता
विभागाचे उपआयुक्त द.ल. ठाकरे, शासकिय औदयौगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य संजय बोरकर,
बी.टी.आर.आय.चे प्राचार्य श्री. आगरकर, शासकिय औदयौगिक प्रशिक्षण संस्थाचे उपप्राचार्य
श्री.चुलेट, कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रांजली
यो.बारस्कर आदी उपस्थित होते.
महिला उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध
असून त्यांनी विभागाव्दारे आयोजित रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा. तसेच कौशल्य विकास
कार्यालयाव्दारे बेरोजगार उमेदवारांकरिता विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा
महिला उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागाचे
उपआयुक्त द.ल.ठाकरे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त
प्रांजली यो.बारस्कर यांनी तर संचलन सोनाली भोगे व आभार प्रदर्शन अभिषेक ठाकरे यांनी
केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन
केंद्र व शासकिय औद्यौगिक प्रशिक्षण संस्थाचे अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
00000
No comments:
Post a Comment