बांधकाम
कामगारांना गृहपयोगी वस्तु संचाचे वितरण सुरु;
वाटपाच्या
ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 10 (जिमाका): महाराष्ट्र
इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबईमार्फत जिल्ह्यातील नोंदणीकृती सक्रिय(जिवीत)
बांधकाम कामगारांना कंपनीमार्फत गृहपयोगी वस्तु संच वितरीत करण्याचे नियोजन करण्यात
आले आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना संच मिळणार असून त्याचे जिल्हा व तालुकास्तरावर
वितरण होणार आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांनी वाटपाच्या ठिकाणी गर्दी करु नये, असे
आवाहन जिल्हा कार्यकारी अधिकारी तथा सहाय्यक कामगार आयुक्त यांनी केले आहे.
जिल्ह्यातील नोंदणीकृती जिवित पात्र
बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तु संच वाटप जिल्ह्यातील संबंधित कंपनीकडून पुढील आठवड्यात
जिल्हा व तालुकास्तरावरील नगरपरिषद, नगरपंचायत येथे नियोजन करण्यात आले आहे. सन
2023-24 मधील नोंदणीकृत जिवित पात्र कामगारांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार
गृहपयोगी वस्तु संच नोंदीत जिवित पात्र कामगारांच्या कुटुंबातील एकाच व्यक्तीला दिला
जाणार आहे. यादीनुसार मे. मफतलाल इंडस्ट्रीज, मुंबई यांच्याकडून दुरध्वनी क्रमांक
7249442793 वरुन नोंदणीकृत लाभार्थ्यांना संपर्क साधून संबंधित लाभार्थ्यांना गृहपयोगी
संच जिल्हा व तालुक्यातील नियोजित जागेवर वितरण केल्या जाईल. त्यामुळे दुरध्वनी क्रमांकावरुन
संपर्क झालेल्या लाभार्थ्यांनी स्वत: मंडळाचे संबंधित मुळ कागदपत्रासह उपस्थित राहावे.
दुरध्वनीवरुन संपर्क झालेल्या कामगारांनाच गृहपयोगी वस्तु संच वाटप होणार असल्याने
वाटपाच्या ठिकाणी गर्दी करु नये. मंडळाची योजना ही निशुल्क असून त्रयस्त व्यक्तीव्दारे
आपली दिशाभुल, फसवणुक करण्यात येत असेल तर नजिकच्या पोलिस स्टेशनमध्ये रितसर तक्रार
दाखल करावी, असे आवाहन उपआयुक्त कार्यालयाव्दारे करण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment